Sex Tips: सेक्स करताना Lube म्हणून नारळाच्या तेलाचा उपयोग किती सुरक्षित आहे? जाणून घ्या
Image For Representation (Photo Credits: Unsplsah)

Coconut Oil As Lube: सेक्स (Sex) करताना ड्राय व्हजायना (Dry Vagina)  म्हणजेच योनीचा कोरडेपणा कित्येकवेळेस मूड स्पॉयलर ठरू शकतो. यामुळे खाज येणे, खूप दुखणे, जळजळ होणे अशा समस्या उद्भवतात आणि सेक्स करण्याची इच्चच उडून जाते. असा एक सर्वसाधारण अनुभव कधी ना कधी प्रत्येकालाच येतो. मात्र असे होऊ द्यायचे नसल्यास प्रायव्हेट पार्ट हा पर्याप्त ल्युब्रिकेटेड ठेवणे आवश्यक आहे. बऱ्याचदा यासाठी काही कपल्स मार्केट मध्ये मिळणाऱ्या ल्युब चा वापर करतात तर काही जण योनीला थुंकी लावून ल्यूब्रिकेट करण्याचा प्रयत्न करतात पण यामुळे इन्फेक्शनचा धोका असतो. असाच एक बहुतांश वेळा वापरला जाणार मार्ग म्हणजे नारळाचे तेल. आज आपण या लेखात नारळाचे तेल ल्युब्रिकेशनसाठी उपयोगी आणि सुरक्षित आहे का हे जाणून घेणार आहोत. याशिवाय ल्युब्रिकेशनचे फायदे सुद्धा आपण आज पाहणार आहोत. चला तर मग एका बेटर सेक्स साठी आवश्यक टिप्स जाणून घेऊयात.. Sex Tips: Boring झालेल्या सेक्स लाईफला नव्याने अनुभवण्यासाठी 'या' टिप्स नक्की येतील कामी, लॉकडाऊनचाही होऊ शकतो फायदा

सेक्स करताना नारळाचे तेल आहे का उत्तम ल्युब?

-अनेकजण आजही नारळाचे तेल हे सेक्ससाठी एकदम सुरक्षित आणि प्रभावी मार्ग म्ह्णून ओळखतात. लोकांच्या मते हा नैसर्गिक पर्याय आहे त्यामुळे याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

- वास्तविक असा कोणता अभ्यासही अजून अस्तित्वात आलेला नाही जो या समजुतीच्या विरुद्ध दावा सिद्ध करू शकेल.

-पण काही तज्ञांच्या माहितीनुसार नारळाच्या तेलाचा परिणाम हा व्यक्तिसापेक्ष बदलू शकतो. म्हणजेच नारळाचे तेल वापरून योनीमध्ये ऍलर्जी झाल्याचीही अनेक प्रकरणे यापूर्वी समोर आली आहेत.

-तर काहींनी आपला अनुभव शेअर करताना नारळाच्या तेलाच्या वासाने उलटी येत असल्याचे सांगितले. शिवाय मुखमैथुन करताना तर हा पर्याय अजिबातच सुचवणार नाही असेही लोक म्हणतात.

-नारळाच्या तेलाचा वापराचा एक महत्वाचा दुष्परिणाम म्हणजे यामुळे योनीची pH लेव्हल बिघडू शकते. योनी मध्ये मुळातच ऍसिडिक तत्व असतात तर नारळाच्या तेलात क्षार असते याचे मिश्रण झाल्याने इन्फेक्शनचा धोका असतो.

साधारणपणे ल्युब चा वापर करण्याची वेळ येण्यामागे काय कारणे आहेत हे जाणून घेणेही आवश्यक आहे, वाढते वय, गोळ्याऔषधांचा अधिक वापर, हार्मोनल बदल यामुळे योनी मध्ये कोरडेपणा येत असतो ल्युब चा वापर करून हा कोरडेपणा घालवून ओलावा आणता येतो. तसेच काही ल्युब्स या उत्तेजना वाढवण्याचे सुद्धा काम करतात. हस्तमैथुन करताना तर ल्युब अधिक उपयुक्त सिद्ध होते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे आवश्यकता भासल्यास डॉक्टरांशी बोलून यासंदर्भात निर्णय घ्यावेत, यास वैद्यकीय सल्ला समजू नये)