Sex Tips: Boring झालेल्या सेक्स लाईफला नव्याने अनुभवण्यासाठी 'या' टिप्स नक्की येतील कामी, लॉकडाऊनचाही होऊ शकतो फायदा
प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

सेक्सचा (Sex) सुखद आणि रोमांचक अनुभव घेण्यासाठी अनेक जोडप्यांची धडपड सुरु असते. आपल्या जोडीदाराला शारीरिक सुखाचा परमोच्च आनंद देण्यासाठी प्रत्येक पुरुष वा स्त्री जोडीदाराची धडपड सुरु असते. सेक्स हे पुरुष आणि स्त्री एकमेकांच्या आणखी जवळ आणण्याचा मार्ग आहे. त्यामुळे आपले नाते कायम टिकून ठेवण्यासाठी आणि त्यासाठी सेक्सची मजा टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक जोडीदार काही तरी नवनवीन गोष्टी करण्याच्या प्रयत्नात असतो. यासाठी सर्वात मुख्य गरज असते ती या विषयावर एकमेकांसोबत मोकळेपणाने संवाद साधण्याची. याने अनेक प्रश्न सुटून जातील.

जोडप्यांमध्ये योग्य संवाद नसल्या कारणाने, आपांआपसातील भांडणाचा परिणाम सेक्स लाईफ वर होतो आणि मग अशा जोडप्यांमधील सेक्स लाईफ कंटाळवाणी होते. अशा बोअर झालेल्या सेक्स लाईफला पुन्हा न्याने अनुभवण्यासाठी ट्राय करा 'या' खास टिप्स

1) एकमेकांसोबत वेळ घालवा

जास्तीत जास्त एकमेकांसोबत वेळ घालवा. बाहेर फिरायला, लाँग ड्राईव्ह ला जा. शांत समुद्र किनारी, एखादा चित्रपट, छान अशा वॉटरपार्कला जा.

2. कँडल लाईट डिनर सारख्या काही रोमँटिक गोष्टी करा

आपल्या जोडीदाराला खूश करण्यासाठी कँडल लाईट डिनर सारखी रोमँटिक डेट प्लान करा.

हेदेखील वाचा- Masturbation Tips: क्वारंटाइन दरम्यान आपल्या पार्टनरसोबत हस्तमैथुन आणखी Interesting बनविण्यासाठी ट्राय करा 'या' हॉट टिप्स

3. Sex बाबत एकमेकांशी मोकळेपणाने बोला

Sex बाबत आपल्या जोडीदाराचे काय मतं आहेत तसेच तुमचे काय मत आहे सांगा. पण त्यात मला सेक्स आवडत नाही किंवा मी कंटाळले/कंटाळलो आहे असे न सांगता तुमचे मत नीट मांडा.

4. सेक्सी कपडे परिधान करा

आपल्या पुरुष पार्टनरला आपल्याकडे आकर्षित कऱण्यासाठी सेक्सी अंर्तवस्त्रे वा अन्य कपडे परिधान करा. एकमेकांची उणी-धुणी काढण्यापेत्रा एकमेकांमध्ये काय चांगलं आहे या गोष्टीवर चर्चा करा. सकारात्मक चर्चा करा. Online Sex Tips: क्वारंटाईनच्या दरम्यान तुमच्या पासून दूर असलेल्या जोडीदारासोबत ऑनलाईन सेक्स डेट कशी कराल?

5. सुट्टीच्या दिवसांत तसेच सध्याच्या लॉकडाऊनमध्येही सेक्सचा पूरेपुर आनंद घ्या

रोजच्या धकाधकीच्या जीवनामुळे कंटाळलेल्या जोडप्यांमध्ये सेक्स करण्याची इच्छा होत नाही. अशा वेळी ज्या दिवशी सुट्टी असेल तेव्हा तुम्ही सेक्सचा उत्तम अनुभव घेऊ शकता. एकमेकांचा स्पर्श, चुंबन, मिठीत घेणं या सर्व गोष्टी सेक्सचा नव्याने अनुभव घेण्यासाठी खूप गरजेच्या असतात.

सध्या सगळीकडे लॉकडाऊन असल्यामुळे सर्वच घरात अडकून पडले आहेत. अशा वेळी आपल्या जोडीदारासोबत तुम्ही छान वेळ घालवून सेक्सचा आनंद द्विगुणित करु शकता.