गरोदरपणात (Pregnancy) आणि मासिक पाळी दरम्यान सेक्स (Sex) करणे हे जितके रोमहर्षक वाटते तितकेच ते धोकादायक देखील असते. विशेषत: गरोदरपणात जेव्हा महिलेच्या शरीरात अनेक बदल झालेले असतात. विशेषत: तिच्या पोटात असलेल्या चिमुकल्या जीवामुळे तिचे पोट पुढे आलेले असते. अशा अवस्थेत तिला रोजच्या सेक्स पोजिशन्स (Sex Positions) करता येत नाही. त्यामुळे महिलेची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. गर्भावस्थेत अनेक महिलांना सेक्स करण्याची इच्छा असते. तसेच सलग 9 महिने आपल्या पत्नीसोबत सेक्स न करता राहणे देखील पुरुषांना शक्य नसते. अशा वेळी काही ठराविक गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही गर्भावस्थेत देखील उत्तमरित्या सेक्स करु शकता.
त्यामुळे गरोदरपणात महिलांना सेक्स दरम्यान काही ठराविक गोष्टी कराव्याशा वाटतात. किंबहुना पुरुषांना जर आपल्या गरोदर पत्नीशी शरीरसंबंध ठेवायचे असतील तर काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
1. हळूवारपणे सेक्स करा
गरोदर महिलेसोबत सेक्स करताना अधिक गतीने आणि जोरात झटके देऊन करू नये. यामुळे महिलांना वेदना होऊ शकतात. पोटातील बाळाला तसा काही धोका नसतो. कारण ते गर्भपिशवीत सुरक्षित असतात.
2. योनीभागात सौम्य मालिश करा.
स्त्रीच्या योनीभागात सौम्य मालिश करा. वा सेक्सपूर्वी तिला हलक्या हाताने मालिश करा. यामुळे तिला थोडे तणामुक्त झाल्यासारखे वाटेल.हेदेखील वाचा- First Time Sex Tips: जोडीदारासोबत पहिल्यांदा संभोग करताना किती वेळ करावा Intercourse? अशा प्रकारे सुरुवात करुन घ्या Orgasm चा आनंद!
3. ल्यूबचा उपयोग करा
गरोदरपणात स्त्रीच्या शरीरात हार्मोन्समध्ये बदल झाल्याने तिचा वजाइनल भाग कोरडा पडलेला असतो. ज्यामुळे तिला सेक्स दरम्यान खाज सुटू शकते. त्यामुळे सेक्स करतेवेळी ल्यूबचा उपयोग करा.
4. फोरप्ले आनंद घ्या
गरोदर महिला पार्टनरसोबत सेक्स करण्याची भीती वाटत असेल तर महिलेला फोरप्लेचा आनंद द्या. ज्यामुळे तुमचे उत्तेजितपणा नियंत्रणात आणण्यास मदत होईळ.
5.चुंबन आणि घट्ट मिठी मारा.
तुम्ही गरोदर महिला जोडीदाराला चुंबन वा घट्ट मिठी मारून देखील तिच्या मनावरील तणाव कमी करु शकता.
6. सेक्स पोजिशन्स
गर्भावस्थेत टॉप आणि डॉगी स्टाईल सेक्स पोजिशनचा वापर करा. ज्यामुळे महिलेच्या पोटावर जास्त दबाव येणार नाही.
सर्वात महत्वाचे गरोदरपणात सेक्स करणे हे महिलेइतकेच पुरुष जोडीदारासाठी तितकेच जिकरीचे काम आहे. तसेच प्रत्येकाच्या शरीराची रचना वेगवेगळी असते. तसेच गरोदरपणाशी संबंधित अनेक समस्या देखील असतात. त्या सर्वांबद्दल पहिल्यांदा डॉक्टरांशी बोलून त्यावर त्यांचा योग्य तो सल्ला घेऊनच सेक्स करावे. आर्ततायीपणा करु नये.
(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)