Orgasmic Princess Sex Position (Photo Credits: File Image)

गरोदरपणात (Pregnancy) अनेक महिलांना सेक्स  (Sex) करण्याची इच्छा होते. मात्र त्यापेक्षा जास्त त्यांना भीती वाटत असते ते आपल्या पोटातील छोट्या जीवाला घेऊन. अशा वेळी आपल्या नव-याने शारीरिक सुखाची (Intercourse)  मागणी केल्यास आपण ती कशी पूर्ण करावी अशी चिंता अनेक स्त्रियांना सतावत असते. ही चिंता जितकी स्त्रियांना सतावते तितकीच त्या बाळाचे वडिल होणा-या पुरुषांनाही. आपल्याकडून जर आपल्या पत्नीस चुकीच्या पद्धतीने हाताळले गेले तर त्याचा परिणाम हा दोघांवरही होऊ शकतो अशी भीती त्यांना असते. मात्र गरोदरपणाच्या या 9 महिन्यात पती-पत्नी दोघांनाही सेक्सची इच्छा होत असणार हे वेगळं सांगायची गरज नाही.

अशा वेळी आपण कोणत्या पद्धतीने सेक्स करावे ज्याचा आपल्या गर्भावर परिणाम होणार नाही आणि पती-पत्नी दोघेही सेक्सचा चांगला अनुभव घेऊ शकतील असा प्रश्न पडल्यास खाली दिलेल्या काही खास सेक्स पोजिशन्स तुमची ही समस्या दूर करण्यास मदत करु शकतात.

1. साइड बाय साइड सेक्स (Side By Side)

या पोजिशन्समध्ये गरोदर महिलांनी बसलेल्या पुरुषांच्या एका बाजूस राहून दोन्ही पाय त्यांच्या कंबरेभोवती कवटाळून घ्याले. जेणेकरून या दोघांचा धडाचा भाग हा एकमेकांना न चिकटता बाजूबाजूला राहिल. ज्यामुळे महिलेच्या पोटावर दाब येणार नाही. Sex Tips: वजनदार महिलांसोबत संभोग करताना 'या' हॉट पोजिशन्स देतील सेक्सचा थ्रिलिंग अनुभव

2. स्पायडर (Spider)

या पोजिशन मध्ये महिलांनी पाठीवर झोपून आपले दोन्ही पाय अलगद फाकवावे. आणि पुरुषांनी महिलांच्या पायांच्या समोर बसून आपले शिस्न महिलांच्या योनीमार्गात टाकून शारीरिक संबंध ठेवावे.

3. स्पूनिंग (Spooning)

बेडवर झोपून मागून मारलेली ही मिठी सेक्स पोझिशनचाही एक भाग आहे. त्याला स्पुनिंग असे म्हणतात. जास्त हालचाल आणि आवाज न करता अगदी आरामदायी पद्धतीने हे सेक्स करता येते. यात बेडवर तुम्ही महिलेच्या मागे झोपून संभोग करु शकता.

4. सीट ऑन टेबल (Seat On Table)

या पोजिशनमध्ये स्त्रियांनी टेबलावर बसून पुरुषांनी त्यांच्या समोर उभे राहून संभोग करू शकता.

5. रिव्हर्स काऊ गर्ल (Reverse Cowgirl)

या पोजिशनमध्ये पुरुषाला खाली झोपवून त्यांच्यावर गरोदर महिलेने बसून सेक्स करावा. ज्यामुळे पोटावर ताण येणार नाही.

या सर्व पोजिशन्स आधी महिलांनी स्वत:ची शारीरिक अवस्था आणि स्वास्थ याची नीट खात्री करून घ्या. तसेच डॉक्टरांचा सल्लाही घ्या. कारण तुमचे वजन, तुमची शरीर स्वास्थ्य अशा पद्धतीने सेक्स करण्यास सक्षम आहे की नाही हे प्रथम पडताळून पाहणे गरजेचे आहे.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये.  डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)