Sex (Photo Credits: Pixabay)

सुखी वैवाहिक जीवनासाठी पत्नी-पतीमध्ये सेक्स लाईफ (Sex Life) उत्तम असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सेक्ससाठी तुमची ऐच्छिक इच्छा देखील तितकीच महत्त्वाची आहे. त्यासाठी तुमचे आणि तुमच्या जोडीदारामध्ये एकमेकांना व्यवस्थित समजून घेण्याची गरज आहे. सेक्स साठी आपल्या पत्नीवर जोर जबरदस्ती करुन वा तिच्या मनाविरुद्ध सेक्स (Sex) केल्यास त्याचा परिणाम तुमच्या नात्यावर होते. कदाचित तुमच्या नात्यात अशी एक पोकळी निर्माण होते जी कधीच भरून काढता येणार नाही. म्हणून या सर्व गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे आहे. यासाठी महिलांच्या काही ठराविक स्थितीत तुम्ही सेक्स करणे त्यांच्या आणि तुमच्या शरीरासाठी घातक करु शकते.

महिलांच्या मासिक पाळीपासून अशा अनेक समस्या आहेत ज्यांचा सरळ सरळ परिणाम त्यांच्या शरीरावर, हार्मोन्स आणि परिणामी त्यांच्या मूडवर होती. अशा वेळी चिडचिड होणे, थकवा येणे हा गोष्टी देखील ओघाओघाने येतात. त्यामुळे महिलांच्या काही ठराविक स्थितीत तुम्ही सेक्स टाळणे अथवा सेक्स करायचे असेल तर त्यांची संमती असणे खूप गरजेचे आहे.

पुढे दिलेल्या स्थितीमध्ये तुम्ही सेक्स टाळणे तुमच्या आरोग्यासाठी हिताचे ठरु शकते.

1. गरोदरपणात

विशेषज्ञांनुसार, गर्भावस्थेत सहाव्या आठवड्यापासून 12 व्या आठवडयापर्यंत सेक्स करु नये असा सल्ला दिला जातो. कारण यामध्ये सेक्स केल्यास गर्भपात होण्याची शक्यता असते.

2. प्रसूतीनंतर

प्रसूती नंतर नव्या जीवाला जन्म देऊन महिलेचे शरीर खूप अशक्त झालेले असते. त्याचा परिणाम शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या तिच्यावर दिसून येतो. त्यामुळे प्रसूतीनंतर 3 महिने तरी सेक्स करणे टाळावे. त्यानंतर त्यांच्यात सेक्सची इच्छा निर्माण होण्यास सुरुवात होते.हेदेखील वाचा- Secret of Amazing Sex Life: रोमांचक आणि उत्साही सेक्स लाईफ मिळविण्यासाठी काही 'सिक्रेट' टिप्स

3. हृदयविकार

जर तुम्हाला हृद्यविकार असतील आणि तुम्हाला बेड रेस्ट घेण्याचा सल्ला दिला गेला असेल तर त्यांनी शक्यतो सेक्स करणे टाळावे. सेक्स दरम्यान उत्तेजितपणा हृदयावर दबाव आणतो. ज्याचा शरीरावर घातक परिणाम होऊ शकतो.

4. मानसिक स्वास्थ्य

केवळ शारीरिक नाही तर मानसिकरित्या स्वस्थ असणे फार गरजेचे आहे. जर तुम्हाला काही मानसिक समस्या असतील आणि त्या दरम्यान तुम्ही सेक्स केलात तर तुम्ही डिप्रेशनमध्येही जाऊ शकता.

5. यौन संचारित रोग

जर तुम्हाला पित्त वा यौन संबंधित रोग असतील तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो. अशा वेळी तुम्हाला सेक्सपासून लांब राहण्याचा सल्ला दिला जातो. एड्स, सिफलिस यांसारखे गंभीर आजार तुम्हाला असतील तर तुम्ही सेक्स करणे टाळावे. यामुळे तुमच्या जोडीदाराच्या शरीरात त्याचे विषाणू संक्रमित होऊ शकतात.

वेदनादायक सेक्स प्रकार अनेकांना सामान्य वाटतात. मात्र ते तसे नसून त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर आणि परिणामी आरोग्यावर होतो. जे जीवानिशी घातकही ठरु शकतात. त्यामुळे काही ठराविक स्थितीत सेक्स शक्यतो टाळणे हितावह ठरू शकते.

(टीप- या लेखात दिलेली माहिती ही प्राप्त माहितीनुसार आहे. या माहितीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही.  म्हणून लेखात दिलेल्या कोणत्याही टिप्स किंवा सूचना अवलंबताना डॉक्टरांचा सल्ला घ्या.)