आपली सेक्स लाईफ (Sex Life) रोमांचक आणि उत्साही बनवावे अशी इच्छा कोणत्या जोडप्याची नसेल असं होणारच नाही. संभोगादरम्यान आपल्या जोडीदाराकडून तितक्याच ताकदीने आणि प्रेमाने संबंध यावा यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न असतो. मात्र तसा प्रतिसाद न मिळाल्यास त्यांचे प्रणयक्रिया उत्साहहीन होते. ज्याचा परिणाम त्यांच्या सेक्स लाईफवर आणि परिणामी त्यांच्या नात्यावर पडतो. यासाठी तुमची सेक्स लाईफ नेहमी थ्रिलिंग आणि उत्साहवर्धक बनविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आपण कुठे कमी पडतो किंवा सेक्स काय करता येईल असा विचार प्रत्येक जोडप्याने केला पाहिजे.
या सर्वांचा विचार करुन आम्ही या लेखातून असे काही सिक्रेट फंडे वा सिक्रेट टिप्स सांगणार आहोत जी तुमची सेक्स लाईफ रोमांचक बनविण्यात मदत करतील.
1. सेक्सबाबत आपल्या स्वत:च्या शरीराविषयी जाणून घेण्यासाठी हस्तमैथुन करा. ज्यामुळे जोडीदारासोबत सेक्स करताना तुम्हाला सेक्स दरम्यान कशात आनंद मिळतो ते समजेल.
2. सेक्स दरम्यान आपल्या जोडीदारासोबत विनम्र आणि त्याच्याबद्दल आदर दाखवा.
3. सेक्स लाईफ थ्रिलिंग बनविण्यासाठी वेगवेगळ्या सेक्स पोजिशन्स ट्राय करा. ज्यात तुम्हाला परमोच्च सुखाचा अनुभव मिळेल.हेदेखील वाचा- Hot Sex Positions: संभोगादरम्यान होणारा त्रास कमी करण्यासाठी ट्राय करा 'या' आरामदायी सेक्स पोजिशन्स ज्यामुळे दोघांनाही मिळेल Orgasm चा अनुभव!
4. परफेक्ट सेक्स लाईफ बनविण्यासाठी तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होणे गरजेचे आहे. त्यामुळे बाहेरील जंक फूड्स, तेलकट पदार्थ खाणे टाळा.
5. सेक्स लाईफ थोडी स्पाईसी बनविण्यासाठी डोळ्यांना पट्टी बांधून सेक्सचा आनंद घ्या. यात तुम्ही BDSM पद्धत ही कधीतरी ट्राय करु शकता.
6. तसेच सेक्स दरम्यान आपल्या जोडीदाराच्या विवस्त्र शरीरावर चॉकलेट सिरप, वाईन, स्ट्रॉबेरी सॉस टाकून सेक्सचा आनंद घ्या.
7. महिलांनी सेक्सी आणि पारदर्शक अशी अंर्तवस्त्रे परिधान करा. यामुळे तुम्हाला सेक्स दरम्यान चांगला अनुभव येईल.
सेक्स हा प्रत्येक जोडप्याच्या नात्याला आणखी घट्ट बनविण्याचा एक उत्तम मार्ग आहे. मात्र त्यासाठी तुमची सेक्स लाईफ तितकीच रोमँटिक आणि थ्रिलिंग असणे गरजेचे आहे. यासाठी हे सिक्रेट फंडे तुम्हाला नक्कीच मदत करतील.
(टीप- या लेखात दिलेली माहिती ही केवळ आरोग्याशी संबंधित माहितीच्या उद्देशाने लिहिलेली आहे. कोणत्याही रोगाच्या उपचारांसाठी किंवा वैद्यकीय सल्ल्यासाठी याचा आधार घेऊ नये. आम्ही असा दावा करू शकत नाही की, लेखात नमूद केलेल्या टिप्स उत्तम प्रकारे कार्य करतील, म्हणून लेखात दिलेल्या कोणत्याही टिप्स किंवा सूचना अवलंबात आणण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)