Reasons For losing Interest In Sex: सेक्सच्या वेळी पार्टनरसोबत त्याचा आनंद घेणे आणि संतुष्ट होण्याची एक मजा वेगळीच असते. कारण सेक्स मुळे नात्यात अधिक जवळीक येऊन पार्टनर एकमेकांना उत्तम पद्धतीने ओळखण्याची संधी त्यांना मिळते. मात्र कालांतराने काही कपल्समध्ये एकमेकांसोबत सेक्स करण्याची कमी होत असल्याचे सध्याच्या काळात दिसून येत आहे. यापाठी काही कारण सुद्धा असू शकतात. त्यामुळे पुरुष आणि महिलांमध्ये सेक्स करण्याची इच्छा कमी होऊ शकते.(Sex Rules: चांगल्या सेक्स लाईफसाठी 'या' महत्त्वाच्या नियमांचे करा पालन अन्यथा नात्यात येईल कडवटपणा)
नात्यात वाढता तणाव आणि मानसिक आरोग्याची अस्थिरता ही तुमच्या सेक्स लाइफवर परिणाम करु शकते. त्यामुळे जरी तुम्ही सेक्स करण्याचा पार्टनरसोबत विचार केल्यास त्यावेळी तुमची चिडचिड झाल्याचे दिसून येईल. यामुळे एकमेकांमध्ये भांडण सुद्धा उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर या काही गोष्टींमुळे पुरुष आणि महिलांमध्ये सेक्स करण्याची इच्छा कमी होऊ शकते.
थकवा: तुम्ही जर खुप थकलेले असल्यास पण पार्टनर सोबत सेक्स करायची इच्छा जरी होत असेल तरीही तुम्हा काही वेळेस ते नकोसे वाटेल. मात्र जर अशी गोष्टी तुमच्यासोबत वारंवार घडत असल्यास त्याचा परिणाम तुमच्या सेक्स लाइफवर नक्की होऊ शकतो. कारण एकमेकांना वेळ देणे ही फार कठीण होऊ शकते.
नात्यात समस्या: तुम्ही तुमच्या नात्यात एखाद्या समस्येमधून जात असल्यास त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करा. अन्यथा समस्या अधिक वाढल्यास एकमेकांबद्दल तिस्कार वाटू लागतो. यामुळे जरी सेक्स करायचे झाल्यास ते नाहीच केलेले बरे असे म्हणून पार्टनर दूरावले जाऊ शकतात.
हॉर्मोन्समध्ये बदल: कधी कधी हार्मोन्समध्ये बदल झाल्यास किंवा ते असंतुलित झाल्यास सेक्स करण्यची इच्छा कमी होई शकते. कारण यामध्ये एस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉनचा स्तर असंतुलित झाल्याने सेक्स करण्यासाठी लागणारी उर्जा ही कमी होऊ शकते. याचा काही वेळेस तुमच्या सेक्स लाइफवर सुद्धा परिणाम होऊ शकतो.(First Time Sex Tips: सेक्स करण्याची पहिलीच वेळ असेल तर ट्राय करा या 'Superhot' पोजिशन्स)
ऐवढेच नाही तर सेक्स करण्यापूर्वी एकमेकांबद्दल वाटणारा आदर नेहमीच कायम रहावा. कारण जर तुम्ही तुमच्या पार्टनरला फक्त सेक्सवेळीच आदर करत असाल तर याचा परिणाम तुमच्या नात्यासह सेक्स लाइफवर ही होईल. ऐवढेच नाही तर सेक्स करनाता तुम्ही पार्टनरला इजा करत असल्यास त्याचा ही अत्यंत वाइट परिणाम तुम्हाला भोगावा लागेल.