Sex Rules: चांगल्या सेक्स लाईफसाठी 'या' महत्त्वाच्या नियमांचे करा पालन अन्यथा नात्यात येईल कडवटपणा
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pexels)

नात्यात दुरावा येण्यासाठी दोनच गोष्टी कारणीभूत असतात ती म्हणजे संवाद (Conversation) आणि सेक्स (Sex). पुरुष आणि महिला एकमेकांच्या जवळ येण्यासाठी एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी एकमेकांसोबत संवाद साधणे गरजेचे आहे. कारण तो जर चांगला असेल तर त्यातून तुमची सेक्स लाईफही (Sex Life) चांगली बनते. यासाठी नेहमी या 2 गोष्टींना महत्व द्या. यात सेक्स साठी काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. तुमचा आर्ततायीपणा तुमची सेक्स लाईफ खराब करु शकतो. यासाठी नीट आपल्या पार्टनरला समजून घेऊन हळूहळू सेक्सचा अनुभव घ्या. जेणेकरून तुम्हाला ऑर्गेज्मपर्यंत (Orgasm)पोहोचण्यास मदत होईल.

सेक्स दरम्यान तुमच्या शरीराची जितकी तयारी असली पाहिजे तितकीच तुमच्या मनाचीही. त्यामुळे सेक्स दरम्यान मानसिक आणि शारीरिक या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी काही ठराविक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

1. सेक्स करताना प्रत्येक वेळेस दोघेही परमोच्च सुखापर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा बाळगू नका. महिला एकापेक्षा अधिक वेळा ऑर्गेज्मचा अनुभव घेतात. Super Sex Tips For Your First Night: लग्नाच्या पहिल्या रात्री सेक्सचा रोमांचकारी अनुभव मिळविण्यासाठी ट्राय करा 'या' टिप्स

2. स्वस्त पुस्तकं, पोर्न फिल्म पाहून सेक्स बद्दल अनेकदा चुकीची माहिती दिली जाते. यात लिंगाच्या आकाराबाबत वाढवून चढवून माहिती दिलेली असते. ज्यामुळे तुमचे लक्ष विचलित होते. ते पाहून, वाचून तुम्ही उलट-सुलट उपाय करता. असे न करु नका. लिंगाचा आकार छोटा असल्याने काही फरक पडत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या.

3. सेक्स कडे एक आव्हान म्हणून न बघता एक भावना म्हणून पाहा. पुरुष सेक्सबाबत मनात अनेक कल्पना रंगवतात. त्यांनी तसे नक्की करावे. ज्यामुळे त्यांच्यातील उत्तेजता वाढते.

4. फोरप्लेसाठी वेळ द्या. आपले जुने दिवस आठवा. परंतु सेक्स करणे बंद करु नका.

या ठराविक नियमांचे पालन करुन तुम्ही सेक्स दरम्यान चांगला अनुभव घेता येईल आणि कदाचित या गोष्टी तुम्हाला परमोच्च सुखापर्यंत पोहोचविण्यास मदत करतील.