Super Sex Tips For Your First Night: लग्नाच्या पहिल्या रात्री सेक्सचा रोमांचकारी अनुभव मिळविण्यासाठी ट्राय करा 'या' टिप्स
Representative Image (Photo Credits: PixaBay)

लग्न (Wedding) हा प्रत्येकाच्या जीवनातील असा एक टप्पा आहे, ज्याने त्यांचे आयुष्य संपूर्ण बदलून जाते आणि एक नवीन प्रवासाला सुरुवात होते. त्यामुळे लग्न होऊ घातलेल्या अनेक तरुण-तरूणींच्या मनात लग्नाविषयी जितकी हुरहूर असते तितकी उत्सुकताही असते. त्यासोबतच लग्नाची पहिली रात्र (First Night) या केवळ कल्पनेने अनेकांच्या पोटात गोळा देखील येतो. कारण प्रत्येक नवोदित जोडप्यासाठी हा अनुभव खूपच वेगळा आणि रोमांचक असा असतो. तर अनेकांच्या मनात थोडी भीतीही असते. लग्नाच्या पहिल्या रात्रीतच आपल्या जोडीदाराला कसे इम्प्रेस करावे यासाठी अनेकांची धडपड सुरु झालेली असते. तर काहींना ही रात्र थ्रिलिंग बनवयाची असते.

यासाठी तुमची लग्नाची पहिली रात्र ही कायम आठवणीत राहावी यासाठी काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे या रात्रीत सेक्स (Sex) करतानाचा अनुभव दीर्घकाळ टिकून राहावा यासाठी काही ठराविक गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजे.

1. जर तुम्ही जास्त थकला आहात तर मध्यरात्री वा सूर्योदयाची वाट पाहा

लग्नाच्या दिवसभराच्या धावपळीत नव्या जोडप्याला फार थकवा जाणवतो. त्यामुळे अशा थकलेल्या अवस्थेत त्यांची सेक्स करण्याची अजिबात इच्छा नसते. अशा वेळी थोडा वेळ आराम करून मध्यरात्री वा पहाटेच्या वेळी सेक्स करणे उत्तम.

2. सेक्सी लिंगरी घाला (अंर्तवस्त्रे)

लग्नाची पहिली रात्री थोडीशी रोमँटिक आणि थ्रिलिंग बनवायची असेल तर स्त्रियांनी छान सेक्सी अशी अंर्तवस्त्रे परिधान करा. यात तुम्ही जाळीदार पँटीसुद्धा धालू शकता. ज्यामुळे तुमचे पति थोडे उत्तेजित होऊन तुम्हाला शारीरिक संभोगादरम्यान चांगला अनुभव येईल. Healthy Sex Tips: सेक्सचा अनुभव द्विगुणित करण्यासाठी 'या' टिप्स फॉलो केल्यात तर तुम्हाला मिळेल शारीरिक सुखाची अनुभूति

3. थोड्या खट्याळ गोष्टींवर बोला

लग्नाच्या पहिल्या रात्री आपल्या जोडीदारासोबत सेक्स, शरीर संबंध यांसारख्या गोष्टींवर बोला. थोडे नॉनव्हेज जोक्स शेअर करा. तसेच ताबडतोब इंटरकोर्स न करता पहिला चुंबन आणि फोरप्ले सुरुवात करा.

4. सेक्स पुस्तक वाचा वा व्हिडिओ बघा

या रात्री तुम्ही आपल्या जोडीदारासोबत सेक्स पुस्तक वाचू शकता. मात्र जर तुम्हाला ते वाचण्यात रस नसेल आणि तुम्हाला वेळ वाया घालवायचा नसेल तर एखादा व्हिडिओ पाहून तुम्ही सेक्स करु शकता.

बहुधा करुन लग्नाच्या पहिल्या रात्री महिला जोडीदाराने आपल्या पतीस सेक्सी लिंगरी घालून खूश करणे जास्त फायद्याचे ठरते. कारण तुमचा पती झालेल्या त्या व्यक्तीस तुमच्या शरीराचा प्रत्येक अवयव पाहण्याची उत्सुकता लागलेली असते. स्त्रीचे सौंदर्य पाहण्यास तुमचा जोडीदार आसुसलेला असतो. अशा वेळी महिलांनी सेक्सी लिंगरी घालणे खूपच महत्त्वाचे ठरु शकते.