पुरुष मंडळींना असे वाटते की महिलांच्या तुलनेत त्यांनाच अधिक खोटे बोलता येते. त्याचसोबत खोट बोलल्यानंतर आपला बचाव होईल अशी मनोमन इच्छा सुद्धा व्यक्त करतात. मात्र एका अभ्यासातून असे सिद्ध झाले आहे की, पुरुष मंडळी सर्रस महिलांसोबत खोट बोलण्यात अव्वल आहेत. एवढेच नाही तर पुरुष मंडळी टेक्स मेसेज किंवा सोशल मीडियाच्या व्यतिरिक्त समोरसमोर खोट बोलण्यात अधिक तरबेज असतात. हा अभ्यास युनिव्हर्सिटी ऑफ पोर्स्टमाउथ, UK यांनी केला आहे.
अभ्यासातून असे सांगण्यात आले आहे की, ज्या व्यक्ती बोलण्यात उत्तम असतात म्हणजेच टॉक्टिव्ह असतात. त्या व्यक्ती दुसऱ्यांच्या तुलनेत अधिक सहज खोटे बोलू शकतात. तर पुरुषांना असे वाटते की, खोटे बोलल्यानंतर आपण त्या गोष्टीमधून वाचू शकतो. खोटे बोलणाऱ्या व्यक्ती त्यांच्या परिवारातील मंडळी, पार्टनर, मित्र किंवा सहकारी यांच्यासोबत सर्वाधिक खोटे बोलतात. पण सोशल मीडियावरील त्यांच्या खोटे बोलण्याची पद्धत वेगळी असून ते खोटे बोलत नसल्याचे समोरच्या व्यक्तीला भासवून देतात. ब्रियान वेरिजिन यांनी असे म्हटले आहे की, पुरुष लोक अधिक खोट बोलणाऱ्यांच्या मध्ये एक खासियत असते. गेल्या अभ्यास सुद्धा असे समोर आले होते की, व्यक्ती प्रत्येक दिवसाला 1 ते 2 वेळेस खोट जरुर बोलतोच. त्याचसोबत प्रत्येक व्यक्ती खोटे बोलतोच असे नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र काही व्यक्ती दररोजच खोट बोलतात आणि त्यात ते तरबेज असल्याचे ही दिसून येतात.(New Year 2020 Dating Tips: नवीन वर्षात कुणाला डेट करायचे असेल तर चुकूनही दुर्लक्षित करु नका या '5' गोष्टी)
काही व्यक्ती असे खोट बोलतात की ते थोड्या वेळासाठी खरे असल्याचे भासवले जाते. त्यावेळी खरे बोलत असून खोटे बोलत नसल्याचे एखाद्याला पटवूनच देतात. व्यक्ती समोरासमोर खोट बोलण्यात जबरदस्त हुशार असतात. खोट बोलण्याची सवय ही अतिशय वाढत चालली आहे.