New Year 2020 Dating Tips: नवीन वर्षात कुणाला डेट करायचे असेल तर चुकूनही दुर्लक्षित करु नका या '5' गोष्टी
Representative Image (Photo Credits: Pixabay)

Dating Tips For New Year 2020: नवीन वर्षाची चाहुल लागली असताना एव्हाना लोकांचे नववर्षाचे प्लान्स ही ठरले असतील. कुठे फिरायला जायचे, काय संकल्प करायचा यांसारख्या अनेक गोष्टीचे नियोजन सुरु झालं असेल. तर तरुण वर्गाला नवीन वर्षात कोणाला डेट करायचे, कुणाला प्रपोज करायची असेल. कुणाला सर्व बळ एकवटून देखील 2019 मध्ये तिला किंवा त्याला प्रपोज करता आले नसेल अशी व्यक्ती 2020 मध्ये त्यांना प्रपोज करण्याचे धाडसही करतील. तसेच काही लोक डेटिंग चे प्लान्स करतील. मात्र नवीन वर्षात डेट करायचे हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून अनेक प्लानिंग करणारी तरुण-तरुणीही अनेक पाहायला मिळतील.

नवीन वर्षात डेटिंग करताना तरुणांनी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, अन्यथा तुमच्या नवीन वर्षात हिरमोडही होऊ शकतो.

पुढे दिलेल्या गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका

1. या संकेतांकडे करु नका दुर्लक्ष

मुळात ज्या व्यक्तीला तुम्ही डेट करत आहात तो व्यक्ती मुळात कसा आहे याची खात्री करुन घ्या. डेट दरम्यान या छोट्या छोट्या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या. उदा. स्वभाव, आपल्यापेक्षा छोट्या व्यक्तींशी कशा प्रकारचा व्यवहार करतो.

2. सर्व काही नियंत्रित करण्याचा प्रयत्न करु नका

तुमच्या पार्टनर ला डेटिंगदरम्यान सर्व काही एकदम परफेक्ट हा दाखवण्याचा प्रयत्न करु नका. यात तुम्ही फसण्याची चिन्हे आहेत. डेटिंगमध्ये कोणत्याही प्रकारची घाई-गडबड करु नका याच्या तुमच्या नात्यावर परिणाम होऊ शकतो. एकमेकांना समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ घ्या.

3. रोमँटिक डेट ची तारीख लक्षात ठेवा

तुमच्या गोड क्षणांची म्हणजेच रोमँटिक डेट ची तारीख लक्षात ठेवा. जेणे करुन तुम्हाला जर तुमची रोमँटिक डेट सोशल मिडियावर शेअर करायची असेल तर तुम्हाला ती डेट लक्षात राहिलेली कधीही चांगले.

हेदेखील वाचा- नव्या वर्षात फिरायला जायचा प्लॅनचा विचार,अवघ्या 899 रुपयांत विमानाने प्रवास करा

4. डेटिंग दरम्यान प्रत्येक क्षण जगा

तुम्हाला जर डेटिंग दरम्यान भूतकाळातील किंवा भविष्यातील गोष्टींची आठवण येत असेल तर तुम्ही डेट एन्जॉय करु शकणार नाही. त्यामुळे सर्वात आधी तो क्षण पूर्णपणे जगा, अनुभवा.

5. पार्टनरशी बातचीत करा, चौकशा नको

डेटिंग दरम्यान तुमच्या पार्टनरसोबत नॉर्मल बातचीत करा. मात्र इकडच्या-तिकडच्या चौकशा करु नका. यामुळे तुमच्या व्यक्तीमत्त्वावर याचा परिणाम होऊ शकतो.

डेट ही खूप खास आणि अद्भूत गोष्ट आहेत. त्यामुळे त्याचा क्षणनक्षण अनुभवा. तरच त्याची मजा आणखी वाढेल.