Sex Tips: सेक्स लाईफ (Sex Life) मध्ये बोअर होत असेल तर वेगवेगळ्या सेक्स पोझिशन (Sex Position) ट्राय करा हा एक साधारण सल्ला सगळेच जण देतात, बहुतांंश वेळा आम्ही ही देतो, मात्र तितकंंच करणंं पुरेसं नाही. हो, सेक्स पोझिशन ही मुळातच फार नंतरची गोष्ट आली त्यापुर्वी कपल्स मध्ये किती जवळीक आहे हे त्यांच्या सेक्स लाईफ बाबत बरंच काही सांगतात. आता ही जवळीक साधायची कशी हा प्रश्न आहेच. कपल म्हणुन तुम्ही एकमेकांंच्या किती जवळ आहात हे तुमच्यातील बॉंंडिग वरुन तपासुन पाहु शकता. तुम्हाला एकमेकांच्या आवडीनिवडी, कम्फर्ट झोन, फॅंटसीज बाबत किती माहिती आहे आणि त्यानुसार तुमचं वागणंं कसंय याचा थेट परिणाम सेक्स लाईफ वर दिसुन येतो, याच पार्श्वभूमीवर आज आपण अशा 5 गोष्टी जाणुन घेणार आहोत ज्या हॉट सेक्स लाईफ साठी अत्यावश्यक सिद्ध होतात.
सेक्स आणि प्रयोग
तुमचा पार्टनर सेक्स लाईफ मध्ये प्रयोग करण्यासाठी किती खुलेपणाने विचार करतो हे जाणुन घ्या. प्रयोग म्हणजे केवळ पोझिशन नाही तर पुढाकार घेण्याबाबत तुमच्या पार्टनरचे काय मत आहे हे पाहा कारण त्यावरच तुम्ही कोणत्या पोझिशन करु शकाल हे अवलंबुन असते. बहुतांंश वेळा पुरुष सेक्स मध्ये अधिक पुढाकार घेतात मात्र जर का तुमच्या महिला पार्टनर ला डॉमिनेट करणे आवडत असेल तर कधी तरी थोडी बॅकसीट घेउन पुरुषांंनी सुद्धा खुले विचार ठेवावेत.
सेक्स आणि संवाद
प्रयोग करण्यासाठी किंवा सेक्स एंजॉय करण्यासाठी संवाद आवश्यक आहेच. कारण तुम्हाला कशाप्रकारे सेक्स करायचा आहे हे तुमच्या पार्टनरला कळायला हवे, हो ना? याशिवाय डर्टी टॉक हा सुद्धा सेक्स मधील महत्वाचा मुद्दा असतो, त्यामुळे या मुद्द्याला दुमत नसावा.
सेक्स आणि स्वच्छता
हो, पाहायला गेल्यास हा मुद्दा देखील तुमच्या सेक्स लाईफ वर परिणाम करु शकतो. विचार करा गलिच्छ किंंवा दुर्गंधित सेक्स पार्ट हे कधीच टर्न ऑन ठरत नाहीत. साधारणतः छान ग्रुम केलेले प्रायव्हेट पार्टस आणि त्यांंची स्वच्छता उत्तेजना देतात. त्यामुळे बेसिक स्वच्छता बाळगत जा.
सेक्स आणि फॅंटसीज
सेक्सशी संबंधित अनेक इच्छा असु शकतात, तुम्ही याबाबत स्वतःसोबतच पार्टनरचा सुद्धा विचार करा. त्यांंच्याशी बोलुन बघा काय माहित कदाचित यामुळे तुमच्या बोअरिंग सेक्स लाईफ मध्ये थोडे बदल येउन थ्रिल यायला मदत होईल.
सेक्स आणि PDA
केवळ बेडरूम मध्येच नव्हे तर PDA म्हणजेच तुम्ही चारचौघात पार्टनर सोबत किती जवळ येता, काहींंच्या बाबत हा टर्न ऑन असु शकतो. विशेषतः नवीन किंंवा तरून कपल्स मध्ये या गोष्टी अधिक परिणामकारक ठरतात. त्यामुळे यात तुमच्या पार्टनरची पसंती लक्षात घ्या.
लॉकडाउन मुळे तर आता सतत एकमेकांच्या जवळ असुन पण सेक्स लाईफ साठीची जवळीक येत नसेल तर या वर दिलेल्या गोष्टींचा विचार करुन पाहा.