प्रेमाला वयाचे बंधण नसते हे खरे. परंतू हेच प्रेम जेव्हा नैतिक-अनैतिकतेच्या (Extramarital Affair) पिंजरऱ्यात अडकले जाते तेव्हा सुरु होतो लपवाछपवी आणि जीवघेणा खेळ. बिहारमधील (Bihar) वैशाली (Vaishali District) जिल्ह्यात असलेल्या देसरी पोलीस स्टेशन (Desari police station) हद्दीत अशीच एक घटना उघडकीस आली आहे. मुरौवतपूर परिसरात ही घटना घडली. प्राप्त माहितीनुसार जावयाच्या प्रेमात सासू दिवानी झाली. सासू ( Mother-In-Law) आणि जावयाचे ( Son-In-Law) चांगलेच सूत जूळले. प्रदीर्घ काळापासून गुपचूप सुरु असलेल्या या प्रकरणाची सासऱ्याला खबर लागली. आपल्या प्रेमात अडथळा नको म्हणून साजू जावयाने सासऱ्याला मृत्यूची वाट दाखवली. सविता राय (सासू), मोहन राय (जावई) अशी आरोपींची नावे आहेत. तर तिलक राय असे मृत सासऱ्याचे नाव आहे
प्राप्त माहितीनुसार, 50 वर्षीय सासरे तिलक राय यांचा मृतदेह ते राहात असलेल्या ठिकाणी शेजारच्या घरात लटकणाऱ्या अवस्थेत आढळून आला. हे घर तिलक राय यांच्या भावाचे होते. तिलक राय यांच्या मृतदेहावर जखमांचे वृणही होते. स्थानिकांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि वैद्यकीय तपासणीसाठी पाठवून दिला. पुढील तपास सुरु केला. (हेही वाचा, 53 टक्के विवाहित भारतीय महिलांनी ठेवले आहेत विवाहबाह्य संबंध; देशातील Married Women बाबतच्या सर्वेक्षणामधून समोर आले धक्कादायक सत्य)
पोलिसांनी केलेल्या तपासात जावई मोहन राय आणि सासू सविता राय यांनी पोलिसांना सांगितले की, तिलक राय हे प्रचंड व्यसनाधीन होते. त्यांना दारुचे व्यसन होते. घटना घडली त्याच्या आदल्या रात्री तिलक राय हे प्रचंड दारु पिऊन झिंगत घरी आले होते. त्यांनी पत्नी सविता राय हिला मारहाण केली आणि रागाच्या भरात ते निघून गेले. पोलिस जावई मोहन राय आणि सासू सविता राय यांचा जबाब नोंदवून निघून गेले. कहाणीत ट्विस आला तो मृत तिलक राय यांच्या भावामुळे. (हेही वाचा, व्याभिचार: विवाहबाह्य संबंध गुन्हा नाही; सर्वोच्च न्यायालयाकडून कलम ४९७ रद्द)
सासू आणि जावयाचा जबाब नोंदवून पोलीस परत गेले. परंतू, थोड्या वेळाने तिलक राय यांचा भाऊ पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला. त्याने थेट तक्रार दिली की, जावणी मोहन राय आणि भावजय (तिलक राय यांची पत्नी) सविता राय या दोघांनी मिळून माझ्या भावाची ( तिलक राय) यांची हत्या केली आहे. (हेही वाचा, पुणे: मैत्रिणीला भेटायला गेला, बायको-मुलांनी घरी नेऊन बदडला; नवऱ्याची पोलिसात फिर्याद, पिंपरी चिंचवड येथील घटना)
पोलिसांनी सासू सविता राय आणि जावई मोहन राय अशा दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. तसेच त्यांनी तिलक याच्या मुलालाही चौकशीसाठी ताब्यत घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर सविता आणि मोहन या दोघांनी मिळून तिलक राय यांचा खून केल्याची धक्कादायक घटना पुढे आली. आज तक या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.