पुणे: मैत्रिणीला भेटायला गेला, बायको-मुलांनी घरी नेऊन बदडला; नवऱ्याची पोलिसात फिर्याद, पिंपरी चिंचवड येथील घटना
Extramarital Affair | (Photo Credits: File Photo)

बायका-पोरांच्या परोक्ष आपल्या मैत्रिणीला (प्रेयसिला) चोरी-छुपे भेटणाऱ्या एका प्रियकर नवऱ्याला त्याच्या पत्नी आणि मुलांनी चांगलाच दणका दिला आहे. हे नवरोबा महोदय आपल्या मैत्रिणीला (Girlfriend) भेटण्यासाठी गेले. बायको आणि त्याची मुलं त्याच्या मागावर होतीच. नवरा जाऊन मैत्रिणीला भेटताच मागावर असलेले बायको (Wife) आणि मुले तिथे आली आणि त्यांनी दोघांनाही रंगेहात पकडले. त्यानंतर पत्नी आणि मुलांनी त्याला घरी नेऊन बदडले. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंडवड (Pimpri Chinchwad) शहरातील डांगे चौक येथे ही घटना घडली. दरम्यान, पतीने आपली पत्नी आणि दोन मुलांविरुद्ध वाकड पोलिसात (Wakad police Station) फिर्याद दिली आहे.

प्राप्त माहितीनुसार, पती संजय सासने यांनी वाकड पोलिसांत पत्नी पौर्णिमा आणि मुलगा देवांग व दीपक यांच्या विरुद्ध तक्रार दिली आहे. बांधकाम व्यवसायिक असलेले संजय सासणे हे रविवाळी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आपल्या मैत्रिणीस भेटायला गेले. त्यांची ही मैत्रीण वाकड येथे राहते. (हेही वाचा, बायकोने अपहरण करुन नवऱ्याच्या प्रेयसीच्या गुप्तांगात भरली चटणी, बनवला VIDEO)

मैत्रिणीला भेटायला गेलेल्या संजय ससाणे यांच्या नकळत त्यांची पत्नी आणि मुलगाही पाठोपाठ आला. त्यांनी मैत्रिणीच्या घरात त्या दोघांना रंगेहात पकडले. या वेळी पौर्णिमा यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी सर्वांची समजूत काढली आणि त्यांना आपापल्या घरी पाठवले. त्यानुसार संजय ससाणे यांना पत्नी पोर्णिमा आणि मुलगा देवांग यांनी घरी आणले.

दरम्यान, त्याच रात्री आठच्या सुमारास पत्नी आणि मुलगा ससाणे यांच्या बेडरुममध्ये आले. त्यांनी त्यांच्या गाडीची चावी आणि फोन काढून घेतला. त्यानंतर पौर्णिमा यांनी संजय ससाणे यांना घट्ट पकडून ठेवले तर मुलगा देवांग याने ससाणे यांना लाथा,बुक्क्यांनी मारले. संजय याच्या दुसरा मुलगा दीपक याने आपल्या कमरेचा पठ्ठा काढून वडील संजय यांना मारहाण केली. यात संजय यांच्या तोंड, खांता, डोके आणि पाठीला जबर दुखापत झाली. दरम्यान, संजय यांनी वाकड पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलीस पुढील प्रकरणाचा तपास करत आहेत.