बायकोने अपहरण करुन नवऱ्याच्या प्रेयसीच्या गुप्तांगात भरली चटणी, बनवला VIDEO
Husband-Wife And Girlfriend | (Photo credit: archived, edited, symbolic images)

एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या गुप्तांगात चटणी भरल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. गुजरात (Gujarat) राज्यातील अहमदाबाद (Ahmedabad) एका 22 वर्षी महिलने आपल्या मैत्रणींच्या मदतीने हे कृत्य केले. पीडित महिलेने आरोप केला आहे की, आरोपी महिलेने आणि तिच्या 3 मैत्रीणींनी तिचे अपहरण केले आणि तिच्या गुप्तांगात (Private Parts) मिर्ची आणि चटणी ( Chilli Powder) भरली. धक्कादायक म्हणजे आरोपींनी पीडित महिलेसोबत हे कृत्य करतानाचा व्हिडिओही बनविल्याचा आरोप आहे. पीडित महिलेचे आरोपी महिलेच्या पतीसोबत प्रेमसंबंध होते. त्या रागातून आरोपी महिलेने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार, गिरीश गोस्वामी नामक युवकासोबत पीडित तरुणीचे प्रेमसंबंध होते. आरोपी महिला जानू गोस्वामी ही गिरीश गोस्वामी याची पत्नी आहे. पीडिता आणि गिरीश गोस्वामी यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून हे सबंध सुरु होते. त्यांच्या प्रेमसंबंधांना गिरीश याच्या पत्नीचा तीव्र विरोध होता. दरम्यान, जानू गोस्वामी हिने पीडितेला अनेक वेळा समज दिली होती. तसेच, पतीलाही अनेक वेळा हे संबंध संपुष्टात आणण्याबाबत सांगितले होते. मात्र, दोघांनीही ऐकले नाही. त्यामुळे जानू गोस्वामी चिडली होती.

दरम्यान, गिरीश गोस्वामी आणि पीडिता हे दोघे एका ठिकाणी भेटणार असल्याची खबर पत्नी जानू गोस्वामी हिला लागली. त्यानुसार नियोजित ठिकाणी जानू गोस्वामी आगोदरच हजर झाली. तसेच, पीडिता घटनास्थळी येताच जानूने तिच्यावर हल्ला चढवला. जानूच्या मैत्रिणींनीही तिला मदत केली. सर्वांनी मिळून पीडितेला पकडले आणि तिच्या गुप्तांगाट चटणी आणि मिरची भरली. पीडिता वेदनेने आरडाओरडा करु लागली. दरम्यान, या सर्व प्रकाराचा व्हिडिओही आरोपींनी बनवला. तसेच, यापुढे पती गिरीश गोस्वामी याला भेटलीस तर अॅसिड अॅटेक करण्याची धमकीही दिली. (हेही वाचा, धक्कादायक! Sex ला नकार देणाऱ्या पत्नीची हत्या करून पतीने स्वतःचेच गुप्तांग कापले, पोलिसांकडे दिली कबुली)

पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी जानू गोस्वामी आणि तिच्या तीन मैत्रिणींवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच, प्राथमिक कारवाई करत जानू गोस्वामी हिच्यासह तिच्या मैत्रिणींनाही अटक केली आहे. पुढील तपास सुरु आहे. तपासात अधिक पुरावे आणि तपशील मिळाल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, पीडितेने आपल्या तक्रारीत जानू गोस्वामी हिच्यावर 50 लाख रुपये मागितल्याचा आरोपही केला आहे.