आपल्यापैकी अनेकांना शारीरिक संबंध (Sexual Relations) ठेवण्याचे फायदे माहिती असतात. पण सेक्स नकरण्याचे म्हणजेच शारीरिक संबंध न ठेवण्याचही काही फायदे (Benefits of Not Having Sex) असतात. हे आपल्याला माहिती आहे काय? समाजामध्ये सेक्स करणाऱ्यांची संख्या जशी अधिक आहे तशीच सेक्स न करणाऱ्यांचीही आहे. सेक्स करण्याचे जसे आरोग्यदायी फायदे आहेत. तसेच सेक्स न करण्याचेही (Benefits of Not Having Intercourse) आहेत. म्हणूनच जाणून घ्या सेक्स न करण्याचे काही फायदे. जे खालीलप्रमाणे आहेत.
गर्भधारणेची चिंता नाही
लैंगिक संबंध हा गर्भधारणेचे प्रमुख कारण असते. अनेक महिलांना किंवा जोडप्यांना नको असलेल्या गर्भधारणेबद्दल भीती असते. आजकाल बाजारात अनेक प्रभावी उपाय, औषधे आणि गर्भनिरोधके उपलब्ध असतात. परंतू, त्यांचा त्यावर विश्वास नसतो. अशा वेळी सेक्स न करणे फायदेशीर ठरु शकते. (हेही वाचा, Anal Sex करण्याची चटक लागलेल्या व्यक्तीची हत्या; घटनास्थळावरुन सेक्स स्प्रे, टॅबलेट, तेल बॉटल आणि दांडके जप्त)
लैंगिक आजारापासून दिलासा
सेक्स केल्याने गुप्तरोग किंवा अनेक लैंगिक आजार होण्याची शक्यता असते. विविध आजार लैंगिक संक्रमनामुळेच होत असतात. याला वैद्यकीय आधार आहे आणि डॉक्टरही अनेकदा अशाच प्रकारचे निदान करतात. अशा वेळी सेक्स न करणे फायद्याचे ठरु शकते. (हेही वाचा, XXX Video: उत्तम सेक्स लाईफ साठी पार्टनरसोबत Porn पाहण्याचे होऊ शकतात 'असे' ही फायदे)
आत्मसंतृष्टीत आनंद
जोडीदारासोबत लैंगिक संबंध ठेवताना नेहमीच स्वत:सोबत जोडीदारालाही तितकाच आनंद मिळतोका हे पाहावे लागते. कधी कधी जोडीदाराची लैंगिक इच्छा पूर्ण होत नाही. अशा वेळी आत्मविश्वास डळमळीत होऊन लक्ष विचलीत होते. त्यामुळे अशा प्रसंगाला तोंड देण्यापेक्षा सेक्स न करणे उत्तम. अशा वेळी सेक्स न करता इतर पर्याय उत्तम ठरतात. अशा वेळी हस्तमैथूनासारखा पर्याय केव्हाही चांगला असे तज्ज्ञ सांगतात. (हेदेखील वाचा- How to Make Sex Last Longer: सेक्स करताना जास्त वेळ टिकून राहायचं असेल तर 'या' 5 पोझिशन नक्की ट्राय करून पहा)
स्वत:कडे लक्ष देण्यास वेळ
जोडीदारासोबत लैंगिक संबंध ठेवण्याची सक्ती नसल्यामुळे किंवा ते ठेवण्याचा पर्यायच उपलब्ध नसेल तर स्वत:कडे अधिक वेळ देता येते. खास करुन स्वत:च्या काही महत्त्वाच्या भावनिक समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ मिळेल. प्रामुख्याने आजारपणानंतर किंवा वैद्यकीय प्रक्रियेनंतर, लैंगिक संबंध ठेवण्यापासून स्वत:ला परावृत्त करणे आवश्यक असू शकते आणि असे केल्याने बरे होण्याची प्रक्रिया त्वरीत होऊ शकते, असे अभ्यासक डॉक्टरांच्या हवाल्याने सांगतात.