How to Make Sex Last Longer: सेक्स करताना जास्त वेळ टिकून राहायचं असेल तर 'या' 5 पोझिशन नक्की ट्राय करून पहा
Image For Representations (Photo Credits: File Image)

How To Last Longer In Bed:  सेक्स करताना कोणती पोझिशन अधिक आनंद देते? पार्टनर ला उत्तेजित करण्यासाठी काय करावे ? या नेहमीच्या प्रश्नांसोबतच आणखीन एक महत्वाचा प्रश्न अनेकांना सतावत असतो आणि तो म्हणजे स्टॅमिना वाढवण्यासाठी काय करावे?. सेक्स करताना परमोच्च क्षणाचा अनुभव घेण्यासाठी लागणरा वेळ म्हणजे तुमचा स्टॅमिना (Stamina On Bed). पण ही बाब व्यक्तिसापेक्ष बदलत असते. हा स्टॅमिना नैसर्गिक दृष्टीने वाढवण्यासाठी योग्य आहार, व्यायाम व एक उत्तम जीवन शैली आवश्यक असते पण साहजिकच रोजच्या धकाधकीत आपल्याला हे सर्व पालन करण्यासाठी वेळ अपुरा पडतो आणि मग अनेक जण वेगवेगळी औषधे ट्राय करून अनैसर्गीक रित्या क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करतात. पण लक्षात घ्या या औषधांचा शरीरावर वाईट परिणाम सुद्धा होऊ शकतो. ही रिस्क जर तुम्हाला घ्यायची नसेल तर तुमच्या सेक्स पोझिशन्स (Sex Position) मध्ये किंचित बदल करून तुम्ही सोप्प्या मार्गाने सेक्स करतानाचा स्टॅमिना वाढवू शकता..

असं म्हणतात की जर का तुम्ही भरपूर अवधी नंतर तुमच्या पार्टनर सोबत इंटिमेट होत असाल तर जास्तीत जास्त तीन मिनिटे इतकाच तुमचा बेड स्टॅमिना टिकुन राहतो. तसेच जर का तुम्ही नियमित किंवा कमी दिवसांच्या अंतराने तुमच्या पार्टनर सोबत सेक्स करत असाल तर तुलनेने तुमचा स्टॅमिना वाढत जातो. जर का तुम्हाला संभोग करताना आपल्या पार्टनर सोबत अधिक काळ टिकून राहायचे असेल तर या काही सेक्स पोझिशन नक्की ट्राय करून पहा..

1- मिशनरी इंपॉसिबल (Missionary Impossible)

जर का तुम्हाला बेडवर जास्त ऍडव्हेंचर करणे आवडत नसेल तर सगळ्यात बेसिक आणि सोप्पी अशी मिशनरी इंपॉसिबल ही पोझिशन आपल्यासाठी बेस्ट पर्याय आहे. एक लक्षात ठेवा यासाठी किंचित जाडसर कंडोमचा वापर करणे सुचवले जाते.  यामध्ये महिला पार्टनर खाली असून तिचे पाय पुरुषच्या खांदयावर असावेत, काही वेळेस पुरुष उभे राहून सुद्धा ही पोझीशन ट्राय करू शकतात.

2- द बॉल मॉनिटर (The Ball Monitor)

जर का तुम्हाला बसून सेक्स करणे आवडत असेल तर द बॉल मॉनिटर ही पोझीशन तुम्हाला नक्कीच फायद्याची ठरेल. यामध्ये सुरुवातीला आपले पाय पार्टनरच्या कंबरेभोवती फिरवून मांडीवर बसावे. तुम्ही कम्फर्टेबल झाल्यावर मग सेक्स सुरु करावा, तत्पूर्वी या मध्ये फोरप्ले साठी बराच वाव मिळतो.

The Supergirl Sex Position: लिंगाचा आकार लहान असला तरी पार्टनरला द्या परमोच्च सुख; ट्राय करा 'द सुपरगर्ल सेक्स पोझिशन

3- द मेजरिंग स्पून (The Measuring Spoon)

यामध्ये दोन्ही पार्टनर्सने एकमेकांच्या शेजारी झोपायचे आहे. एकाने आपले पाय पसरवून त्यात दुसऱ्या पार्टनरला विरुद्ध दिशेने आत खेचावे, काही वेळाने तुम्ही एकमेकांकडे तोंड करून देखील ही पोझिशन ट्राय करू शकता. जेव्हातुम्ही या पोझिशन मध्ये सेक्स करत असाल तेव्हा प्रायव्हेट पार्ट हे नीट ल्युब्रिकेटेड असतील याचे खात्री करून घ्या, तसेच ही पूर्ण क्रिया हळू हळू धक्के देत केल्यास अधिक वेळ टिकवता येते.

4- द नॉकर रॉकर (The Knocker Rocker)

तुम्हाला बेड व्यतिरिक्त देखील सेक्स एन्जॉय करायचा असेल तर ही पोझिशन उपयुक्त ठरेल. यामध्ये तुम्ही एका खुर्चीवर बसून तुमच्या पार्टनरला आपली मांडीवर बसवून सेक्स करू शकता.

Oral Sex मुळे वाढू शकते प्रणयाची मजा; मात्र मुखमैथुन करण्याआधी घ्यायला हवी 'ही' काळजी

5- इंटरप्टेड डॉग (Interrupted Dog)

इंटरप्टेड डॉग सेक्स पोझिशन ट्राय करत असताना आधी तुमचे गुडघे पसरवत हाताच्या आधारे उलटे झोपावे त्यांनतर तुमच्या पार्टनरने वरून सारखीच पोझिशन घेत आपले लिंग इन्सर्ट करावे. या वेळी एका शरीरावरची पकड स्थिर ठेवा जेणेकरून संभोगाच्या वेळी सरकायला होणार नाही.

दरम्यान, या सर्व सेक्स पोझिशनचा वापर करताना तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत कम्फर्टेबल असणे गरजेचे आहे. तसेच सेक्स करतेवेळी केवळ स्वतःचा विचार न करता पार्टनरला सुद्धा परमोच्च सुखाचा अनुभव घेता येत आहे याची खात्री करून घ्यावी.

(सूचना : या लेखाचा उद्देश हा माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे)