Oral Sex मुळे वाढू शकते प्रणयाची मजा; मात्र मुखमैथुन करण्याआधी घ्यायला हवी 'ही' काळजी
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

स्त्री पुरुषांच्या नात्याची वीण घट्ट होण्यासाठी हेल्दी सेक्स (Sex) फार महत्वाचा आहे. स्त्री पुरुषांमध्ये कमी जास्त प्रमाणात सेक्सची आवड, इच्छा असते. मात्र सेक्सचे प्रमाण कितीही असो, त्या पेक्षा सेक्सचा दर्जा म्हणजेच दोन्ही पार्टनर सेक्स एन्जॉय करतात का, ते महत्वाचे आहे. सर्वसाधारणपणे एकच आणि ठराविक पद्धतीचा सेक्स केल्याने दोघेही बोअर होण्याची शक्यता असते. अशावेळी काही नवीन पद्धती ट्राय केल्या जातात, त्यातील एक म्हणजे ओरल सेक्स म्हणजेच मुखमैथुन (Oral Sex). ओरल सेक्स म्हणजे तुमच्या साथीदाराच्या जननेंद्रियाला (Vagina or Anus or Penis)  उत्साहीत करण्यासाठी तोंडाचा वापर करणे. आजकाल सेक्समध्ये ओरल सेक्सचे प्रमाण वाढले आहे. मात्र ओरल सेक्स करण्याआधी काही काळजी घेणे आवश्यक आहे.

> सर्वात महत्वाचे म्हणजे आपला जोडीदार ओरल सेक्ससाठी तयार नसेल तर जबरदस्ती करू नका. जर योग्य काळजी घेऊन केलात तर ओरल सेक्स सुरक्षित आहे, नाहीतर यामुळे अनेक आजार उद्भवण्याची शक्यता असते.

> ओरल सेक्स आधी आपले प्रायव्हेट पार्टस स्वच्छ पाण्याने धुणे आवश्यक आहे. पुरुषांनी साबण अथवा इंटीमेट वॉशचा वापर करून, शिश्नावरची त्वचा मागे सारून शिश्निका स्वच्छ करा. तसेच आपल्या शरीरावर कोणतेही इन्फेक्शन, खाज किंवा इतर त्वचेचे आजार नाहीत ना ते पाहावे.

> ओरल सेक्स करण्याआधी आपल्या प्रायव्हेट पार्टस सभोवतीचे केस काढणे किंवा ते बारीक करणे गरजेचे आहे. बरेचवेळा या केसांच्या अस्वच्छतेमुळे लैंगिक आजार होण्याची शक्यता असते.

> ओरल सेक्स करणार असाल तर त्यापूर्वी दातांना ब्रश करणे, जीभ साफ करणे टाळा.

> ओरलसेक्स आधी तोंडामध्ये कुठेही जखम नाही ना याची काळजी घ्यावी. अल्सर, ओठ फाटलेले असणे, हिरड्यांजवळ जखम अशा गोष्टी असतील ओरल सेक्स कटाक्षाने टाळावा.

> ओरल सेक्स करताना हळुवारपणे आणि काळजीपूर्वक करावा. जोर लावून केल्या जाणाऱ्या मुखमैथूनामध्ये प्रायव्हेट पार्टसना दातामुळे जखम होण्याची शक्याता असते. (हेही वाचा: Oral Sex एन्जॉय करताना, स्त्रियांना खुश ठेवण्यासाठी अशी घ्या आपल्या प्रायव्हेट पार्टसची काळजी)

> जोडीदाराला जर एच.आय.व्ही. ची लागण झाली असेल तर सेक्स करताना काळजी घ्यावी. अशावेळी ओरल सेक्स करताना कंडोम वापर जरुर करावा.

> एचआयव्ही सोबतच ओरल सेक्समधून हरपीझ होण्याची शक्यता असते. हरपीझ हा कॉमन सेक्सुअल डिसिझ आहे. याचा परिणाम तुमच्या प्रायव्हेट पार्टस सोबत त्वचेवरही होतो. त्यामुळे आपण सेक्स करत असणारा पार्टनर हायजनिक आहे का नाही ते तपासून घ्यावे.

(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे.)