Anant Ambani-Radhika Merchant Wedding Invitation Card वरील 'शांताकारं भुजगशयनं...' मंत्राचा अर्थ काय सांगतो?
Ambani Wedding Card | X

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्याची पत्रिका (Anant Ambani-Radhika Merchant Wedding Invitation Card) समोर आली आहे. सध्या या जोडप्याची दुसरी प्री वेडिंग पार्टी इटली-फ्रान्स क्रूझ वर होत असताना आज त्यांच्या लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेची पहिली झलक समोर आली आहे. 12 जुलै दिवशी अनंत आणि राधिकाचा मुख्य लग्न सोहळा आहे. 13 जुलै दिवशी त्यांच्या लग्नाचे काही विधी आहेत तर 14 जुलै दिवशी लग्नाचं रिसेप्शन असणार आहे. या आमंत्रण पत्रिकेला भगवान विष्णूंना समर्पित एका श्लोकाचा उल्लेख आहे. अंबानी कुटुंब देशा-परदेशातील मान्यवरांच्या उपस्थित विवाह करणार असले तरीही घरातील प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते धार्मिक आणि सांस्कृतिक गोष्टींनाही तितकंच महत्त्व देतात. अनंत अंबानी स्वतः धार्मिक असल्याने त्यांच्या लग्न आमंत्रण पत्रिकेवर असलेल्या त्या श्लोकाचा नेमका अर्थ काय आहे? हे नक्की जाणून घ्या.

राधिका आणि अनंत अंबानी लग्न सोहळा

राधिका आणि अनंतच्या लग्न पत्रिकेवर 'शान्ताकारं भुजगश्यानं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम । लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं।वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकेकनाथम् ॥' हा श्लोक लिहलेला आहे. याचा मराठीत असा अर्थ होतो की , 'ज्यांचे स्वरूप शांत आहे, आदिशेष नागावर विसावला आहे, ज्याच्या नाभीवर कमळ आहे आणि जो देवांचा स्वामी आहे, अशा श्रीविष्णूला नमस्कार. जो विश्वाला धारण करतो, जो आकाशासारखा अमर्याद आणि अनंत आहे, ज्याचा रंग ढगासारखा (निळा) आहे आणि ज्याचे शरीर सुंदर आणि शुभ आहे, देवी लक्ष्मीचा पती, ज्याचे डोळे कमळासारखे आहेत आणि ज्याला ध्यानाने योगी प्राप्त करू शकतात, जगाचे भय दूर करणाऱ्या आणि सर्व जगाचा स्वामी असलेल्या त्या भगवान विष्णूला नमस्कार असो.  Anant Ambani-Radhika Merchant 2nd Pre-Wedding Bash: इटली-फ्रान्स मध्ये राधिका-अनंतच्या प्री वेडिंग क्रुझ पार्टीचं 29 मे ते 1 जून दरम्यान 'असं' आहे नियोजन! 

लाल आणि सोनेरी रंगात असलेल्या लग्नपत्रिकेवरही व्यंकटेश्वर स्वामी आणि पद्मावती अम्मावरू यांचे रूप आहे. व्यंकटेश्वर स्वामी हे भगवान विष्णूंचेच रूप आहे. वैदिक पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे.