कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता फैलाव पाहता आता प्रत्येकाला स्वतःच्या स्वच्छतेची काळजी घेणे अत्यावश्यक होऊन बसले आहे. कोरोनाच्या विषाणूला रोखण्यासाठी स्वतःसोबतच आपण जिथे राहतो त्या वास्तूची आणि परिसराची देखील स्वच्छता राखली गेली पाहिजे. सरकारी यंत्रणांकडून यासाठी सार्वजनिक ठिकाणी निर्जंतुकीकरणाच्या औषधांची फवारणी केली जात आहे, असेच निर्जंतुकीकरण घरात सुद्धा करण्याची गरज आहे. साहजिकच यासाठी औषध फवारणी हा काही मार्ग नाही, मात्र त्याऐवजी काही सोप्प्या नैसर्गिक पद्धतींचा वापर करून सुद्धा तुम्हाला हे काम करता येईल. फार नाही तर निदान दिवसातून दोनदा घरातून केर काढणे, फर्निचर स्वच्छ करणे, फरशी पुसणे यासोबतच अधिक दक्षता म्ह्णून जंतूंना घालवण्यासाठी या काही नैसर्गिक वस्तूंचा आपल्याला वापर करता येईल. काय आहेत या गोष्टी चला तर जाणून घेऊयात..
Coronavirus रोखण्यासाठी वारंवार वापरताय सॅनिटायझर? 'या' गोष्टी नक्की लक्षात घ्या
नैसर्गिक रित्या घराचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी काय वापराल?
कापूर
कापुराचा दर्प हा अत्यंत गुणकारी मानला जातो. सर्दी, खोकला, ताप, हवेतून पसरणारे साथीचे आजार घरात कापूर जाळण्याने कमी होतात. कापूर अथवा धूप जाळल्यामुळे हवा देखील शुद्ध राहते.
कडुलिंबाचा पाला
घरात डास, मच्छर किंवा छोटे मोठे किटाणू घोंगावर असतील तर कडुलिंबाबाचा पाला जाळावा, सुक्या करवंटीसोबत कडुलिंबाचा धूर केल्याने हवेतील सर्व किटाणू नष्ट होतात,यामंडई सुद्धा जर का कापूर टाकले तर अधिक फायदा होऊ शकतो. याशिवाय घराच्या दारात खिडकीवर कडुलिंबाचा पाला लटकवून ठेवावा. स्वतःच्या स्वच्छतेसाठी सुद्धा आपण कडुलिंबाच्या पाल्याचे पाणी वापरू शकता.
जाड मीठ
घर दिवसातून एकदा जाड मिठाच्या पाण्याने पुसून काढावे, दारे- खिडक्या सुद्धा स्वच्छ कराव्यात. मिठातील जंतुनाशक गुणधर्म तर सर्वज्ञात आहेत, तसेच मीठ हे प्रत्येक घरात असतेच. त्यामुळे हा पर्याय अधिक मेहनत न करता झटपट प्रभाव दर्शवणारा आहे. याशिवाय घराच्या कोपऱ्यात एका छोट्या वाटीत मिठाचे सुद्धा कानाकोपऱ्यातील जंतू नष्ट होण्यास मदत होते.
निलगिरीचे तेल
निलगिरीच्या तेलाचा उग्र दर्प श्वसनाचे विकार आणि संसर्गजन्य विकारांना दूर ठेवण्यासाठी बेस्ट औषध आहे. बेडशीट, सोफाकव्हर, पडदे अशा कापडी वस्तूंवर निलगिरीच्या तेलाचे काही थेंब लावल्यास घरातील जीवजंतू नष्ट होतात.
लिंबू+ व्हिनेगर+ बेकिंग सोडा
लिंबू मध्ये असणारे ऍसिडिक गुणधर्म जंतूंना मारक ठरतात. लिंबू आणि बेकिंग सोडा तसेच व्हिनेगरचे मिश्रण लावून घरातील तांब्या पितळेची भांडी स्वच्छ करता येतात, या भांड्यनावर अनेकदा छोटे किटाणू फिरताना आपण पहिले असतील या भांड्याची स्वच्छता केल्याने हे जंतू नष्ट होतात, याशिवाय घराच्या कोपर्यात लिंबू आणि त्यावर लवंग लावून ठेवल्याने सुद्धा कीटक मारून जातात.
असं म्हणतात निरोगी घर हवे असेल तर स्वच्छता बाळगणे सर्वात जास्त महत्वाचे आहे, त्यासाठी तुम्हाला हे वरील उपाय नक्की मदत करतील. खास म्हणजे केमिकल्सचा मारा करून घरात स्वच्छता करण्यापेक्षा हे मार्ग नैसर्गिक रित्या घर स्वच्छ करतील. याचा उपयोग होतो का हे आम्हाला नक्की कळवा.