येथे रोज बदलतो गणपतीचा आकार !

आंध्रप्रदेश : गणपती हे अनेकांचे आवडते दैवत आहे. कोणत्याही कार्याची सुरूवात ही गणेशपूजेने केली जाते. घरामध्ये संपन्नता, समृद्धी, सौभाग्य आणि पैसा सतत नांदत रहावा याकरिता गणेशाची पूजा केली जाते. देशापरदेशात गणेशमूर्तीचे पूजन केले जाते. मात्र एका गणेश मंदिरात स्थापन केलेल्या गणेशमूर्तीचा आकार नियमित बदलत राहतो. मग जाणून घेऊयात कुठे आहे हे खास गणेशमंदीर ?

आंध्रप्रदेशात खास मंदीर

आंध्रप्रदेशातील चित्तूरमध्ये गणपतीचे एक खास मंदीर आहे. या प्राचीन मंदिराची स्थापना चोळ राजांनी केली होती. या मंदिरात अनेक अद्भूत गोष्टी आणि चमत्कार पहायला मिळतात. या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते.

गणेशमूर्ती बदलत राहते

कनिपक्कम गणेश मंदिर हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मंदिरात गणेशमूर्तींचा आकार नियमित बदलत राहतो. प्रामुख्याने गणपतीच्या पोटाचा आणि पायाचा आकार बदलतो. हे गणेशमंदीर विशाल नदीच्या मधोमध वसलं आहे. या गणपतीसाठी खास कवच बनवण्यात आलं होतं. मात्र ते घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते गणपतीच्या मापात बसलंचं नाही.