Superfoods (PC - Twitter)

Superfoods for Health and Skin Benefits: काहीवेळा जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपल्याला आपल्या शरीरात अशक्तपणा जाणवतो. त्यामुळे आपण सक्रिय राहू शकत नाही. झोप झाल्यानंतरही आपल्याला फ्रेश वाटतं नाही. तुम्हालाही अशा समस्यांचा सामना करावा लागत असेल तर ही लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. दिवसभर फ्रेश आणि निरोगी राहण्यासाठी आपण आपल्या आहारात काही सुपरफूडचा समावेश केला पाहिजे. असे सुपरफूड, जे आपल्या संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर जीवनसत्त्वांनी परिपूर्ण असतात. जेणेकरुन तुम्ही केवळ निरोगीच राहाल असे नाही तर सकाळी मॉर्निंग सिकनेस देखील टाळता येईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गोष्टी त्वचेसाठीही खूप प्रभावी आहेत. चला तर मग या सुपरफूड विषयी जाणून घेऊयात...

फ्लॅक्स सीड्स (Flax Seeds) -

ओमेगा-3 फॅटी अॅसिड हे वजन कमी करण्यात मदत करण्यासाठी एक उत्तम सुपरफूड आहे. याशिवाय, ते कोलेस्ट्रॉल मुक्त आहे. त्यामुळे ते तुमच्या हृदयासाठी खूप चांगले आहेत. जर तुम्हाला केस गळण्याची समस्या असेल तर तुम्ही या हेल्दी फूडचा आहारात समावेश करा. (हेही वाचा - Hair Care Tips In Monsoon: पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी; 'या' सोप्या टीप्स करतील तुमच्या समस्या दूर, वाचा सविस्तर)

खोबरेल तेल -

खोबरेल तेल त्वचा, आरोग्य आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. बॉडी लोशन, फेस क्रीममध्ये नारळ तेल एक उत्तम मॉइश्चरायझर आहे. याशिवाय खोबरेल तेलही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरने भरपूर खोबरेल तेल वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत करते.

पपई -

पपईमध्ये जीवनसत्त्वे ए, सी आणि ई भरपूर प्रमाणात असतात. म्हणजेच पपई तुम्हाला मधुमेह, हृदयरोग यांसारख्या आजारांपासून वाचवते. अनियमित मासिक सायकल असलेल्या महिलांसाठी पपईचे ज्यूस उत्तम आहे. कारण, तो सायकल सामान्य करण्यास मदत करू शकतो. तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्याचा हा एक चांगला स्रोत आहे.

कोरफड -

कोरफडीचा वापर त्वचेच्या अनेक समस्यांवर उपचार करण्यासाठी केला जातो. हे मुरुम, आणि सनबर्नवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. एलोवेरा जेलमध्ये वृद्धत्व विरोधी गुणधर्म देखील आहेत. त्याच वेळी, कोरफडचा रस प्यायल्याने बद्धकोष्ठता आणि छातीत जळजळ दूर होण्यास मदत होते. त्याचा रस प्यायल्याने पचनक्रियाही चांगली होते.

ऑलिव्ह तेल -

ऑलिव्ह ऑइल शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यासोबतच कोलेस्ट्रॉल, हृदयविकाराचा धोका कमी करते. त्याचवेळी, त्वचेसाठी ऑलिव्ह ऑइल गुणकारी आहे. यामध्ये हायड्रेटिंग गुणधर्मांसह अँटी-एजिंग अँटीऑक्सिडंट्ससारखे बरेच चांगले गुण असतात.