
सेक्स (Sex) ही पती पत्नीमधील नाते वृद्धिंगत करण्यासाठी एक गरज बनली आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सेक्स ही अशी एक गोष्ट आहे जी पती पत्नीला एकत्र बांधून ठेवते. स्त्रियांची उत्तेजकता ही पुरुषांपेक्षा जास्त असते हे आपणास माहीतच आहे. मात्र सध्याच्या ताण तणावाच्या आयुष्यात पुरुषांची उत्तेजकता आणि स्टॅमिना फार काळ टिकून राहत नाही. हीच बऱ्याच स्त्रियांसाठी समस्या बनलेली असते मात्र स्त्रिया बोलून दाखवत नाहीत. यासाठी पुरुषांनी स्वतः यावर काही उपाययोजना करणे आवश्यक असते. बाहेर यासाठी काही औषधे मिळतात मात्र त्यांचे साईड इफेक्ट्सही असतात. म्हणून तुम्हाला स्टॅमिना वाढवण्यासाठी हे सुपरफूड ट्राय करणे गरजेचे आहे.
सेक्सपूर्वी केळं खाणे हितावह आहे. त्यातून मिळणार्या पोटॅशियम घटकांमुळे शरिरात ग्लुकोजचे प्रमाण वाढते. परिणामी तुम्ही अधिकवेळ सेक्सचा आनंद घेऊ शकता.
भोपळा आणि मोहरीच्या बिया- आहारात या दोन्हीचा वापर केल्यास सेक्स पॉवर वाढण्यास मदत होते. हे दोन्ही हर्बल असून त्याचा आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही.
ओवा - ओवा सेक्स लाइफ इम्प्रूव्ह करण्यासोबतच मूड चांगला करते. यामध्ये एंड्रोस्टेरॉन असते. महिलांचा स्टॅमिना वाढवण्यासाठी हे जास्त चांगले मानले जाते. परंतु याची भाजी खावी. मसाला खाऊ नये.
अकाकिया - अकाकिया म्हणजे बाभूळाच्या बिया व पानाच्या रसाला सुखवून त्याच्या वड्या तयार केल्या जातात. अकाकिया धातु घट्ट करणे व स्वप्न दोष घालवण्यासाठी उत्तम औषध आहे.
तीळ - तिळामध्ये असलेले झिंक सेक्स लाइफसाठी उत्तम पोषक तत्व आहे. यासोबतच हे टेस्टोस्टेरॉनला उत्प्रेरीत करून पुरुषांमध्ये शुक्राणूची वृद्धी करण्यास मदत करतात. तर मग उत्तम सेक्स लाइफ आणि कामेच्छा वृद्धीसाठी नियमित तिळाचे सेवन हा एक चांगला उपाय आहे.
स्ट्रॉबेरी – यामध्ये उपलब्ध असेलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सीडेंट पुरुषांमध्ये शुक्राणूंची वृद्धी करण्यात सहायक ठरतात. तसेच डार्क चॉकलेटसोबत स्ट्रॉबेरी तुमच्या कामेच्छेमध्ये वृद्धी करून तुमचा मूड बनवू शकते. (हेही वाचा : आता सेक्ससाठी महिलांना पुरुषांची गरज नाही; ही खेळणी देत आहेत परमोच्च आनंद)
डाळिंब -डाळिंबाचे फळ आहारात घेतल्याने किंवा डाळिंबाचे ज्यूस नियमित सेवन केल्याने सेक्स पॉवर दुपटीने वाढते, असे एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे. डाळिंबाच्या ज्यूसमुळे सेक्स जागृत करणारा हॉर्मोन्स 'टेस्टास्टेरॉन' उत्तेजीत होऊन तो अधिक कार्यशील होत असतो.
लसूण - लसणामुळे पदार्थांची चव वाढण्यास तर मदत होतेच त्याचबरोबर यामुळे प्रणयमध्येदेखील उत्तम वाढ होते. प्रणयामुळे आलेला थकवा दूर करण्यासाठी तसेच कामेच्छा वाढवण्यासाठी लसणाचे सेवन फायदेशीर आहे. रोज सकाळी लसणाच्या 2-3 पाकळ्या चावून खाल्ल्याने फायदा होतो.
शाकाहारी पुरूष मांसाहारी पुरूषांपेक्षा अधिक वेळ सेक्सचा आनंद घेऊ शकतात. भाज्या आणि फळांमधून पुरेशी पोषणद्रव्य शरीराला मिळत असल्याने तुमचा स्टॅमिना वाढतो. सेक्सचा आनंद मिळवायचा असेल तर थोड्या संयमाची गरज आहे. थेट संभोग करण्याऐवजी कामक्रिडेलाही वेळ द्या, यामुळे तुम्ही त्यांना ऑरगॅझमचा आनंदही अधिक देऊ शकता.