
स्वतःच्या गाडीने प्रवास करणं असो वा कॅबने, अनेकजण एसीशिवाय प्रवास करूच शकत नाहीत. अनेकदा केवळ एसीचा थंडावा मिळावा म्हणूनच आरामच्या वेळी अनेक लोक कारमध्ये जाऊन बसतात. आणि प्रामुख्याने असे दिसून आले आहे की दुपारच्या जेवणानंतर किंवा शॉपिंगच्या वेळी लोक आरामासाठी हा मार्ग अवलंबतात. परंतु, तज्ज्ञांच्या मते जर आपण बंद कारमध्ये एसी चालू करून झोपत असाल, तर सावधान. कारण ही गोष्ट तुमच्या जीवावर बेतू शकते. त्यामागचं नेमकं कारण काय ते आज आपण पाहणार आहोत.
बंद कार ही एखाद्या छोट्या बंद खोलीसारखीच असते. याचा परिणाम म्हणजे अशा बंद कारमध्ये एसी चालू ठेवला तर जितकं व्हेंटिलेशन आवश्यक असतं तितकं मिळू शकत नाही. आणि म्हणूनच बंद कारमध्ये कार्बन मोनो ऑक्साईड हा गॅस तयार व्हायला सुरुवात होते. कार्बन मोनो ऑक्साईड हा ऑक्सिजन आणि कार्बन या दोन गॅसच्या मिश्रणापासून तयार होतो. हळूहळू कार मधील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ लागते ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.