Photo Credit- X

Delhi Police Road Accident Video:  दिल्लीतील नेब सराय परिसरातून अतिशय धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. दोन वाहतूक(Traffic Cops) पोलिसांना कारच्या बोनटवरून ओढल्याची (Cops Dragged) घटना घडली आहे. ही घटना शनिवार, 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गाडी थांबवण्यास सांगितल्यावर कारचालकाने गाडी न थांबवता ट्राफिक पोलिसांना बोनेटवर ओढत नेले.

दोन वाहतूक पोलिस कारच्या बोनेटला लटकलेले दिसत आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, वाहतूक पोलिसांनी त्यांना करा थांबवण्यस सांगितले मात्र कार चालकाने गाडी थांबवली नाही. ते कधी कार पुढे, कधी मागे, कधी रस्त्याच्या पलीकडे चालवत राहिले. या घटनेत वाहतूक पोलिस गाडीवरून खाली पडतो. (Hindu Temple Attacked in Canada: कॅनडात हिंदू मंदिरावर खलिस्तानींचा हल्ला, भाविकांना मारहाण; पंतप्रधान ट्रुडोंचा निषेध!)

सुदैवाने या घटनेत पोलिस कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली नाही. या घटनेनंतर कारस्वार घटनास्थळावरून पळून गेला. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. वाहनाचा क्रमांक समोर आला आहे. दोन वाहतूक पोलिसांपैकी एक एएसआय आणि दुसरा हेड कॉन्स्टेबल आहे. वाहतूक पोलिसांनी या प्रकरणाची माहिती स्थानिक पोलिसांना दिली, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचे नाव जय भगवान असे असून तो वसंत कुंज येथील रहिवासी आहे.

तक्रारीत सांगितले की, तो आणि हेड कॉन्स्टेबल चलन जमा करत होते. तेवढ्यात एका कारने सिग्नल तोडला, त्यावर ट्राफिक पोलिसांनी कार चालकाला थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने कार थांबवली नाही, त्याबदल्यात दोन्ही वाहतूक पोलिसांना लांबपर्यंत बोनेटवर ओढत नेले. एफआयआरमध्ये हत्येचा प्रयत्न आणि कार्यालयीन कामात अडथळा आणल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.