Photo Credit- X

Hindu Temple Attacked in Canada: कॅनडातील ब्रॅम्प्टन परिसरातल्या एका हिंदू मंदिरावर रविवारी(Pro Khalistani Attacked Hindu Temple) खलिस्तानवाद्यांनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खलिस्तानवादी आणि मंदिरातील भाविक असे दोन्ही गट आपापसांत भिडले. त्यात तुफान हाणामारी झाली. दोन्ही बाजूंनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. काहीजण जखमी झाल्याचंही वृत्त आहे.

भारतीय उच्चाधिकारी मंदिराला भेट देण्यासाठी आल्याचा निषेध म्हणून आम्ही आंदोलन करत होतो, असा दावा या घटनेत सहभागी खलिस्तानवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ कडून करण्यात आला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, विरोधी पक्षनेते पिएर्रे पोलिव्हरे व एनडीपी नेते जगमीत सिंग यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या घटनेनंतर कॅनडातील उच्चपदस्थ नेतेमंडळींनी या प्रकाराचा निषेध केला आहे. (हेही वाचा: US Presidential Elections 2024: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपद निवडणूकीमध्ये Donald Trump यांच्या विजयासाठी भारतात Mahamandelshwar Swami Vedmutinand Saraswati कडून पूजा) 

त्यांनी त्यांचे मत व्यक्त करताना म्हटले की, 'कॅनडातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या धार्मिक प्रथांचं मुक्त व सुरक्षित वातावरणात पालन करण्याचा अधिकार आहे', अशी प्रतिक्रिया पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये दिली आहे. तर, विरोधी पक्षनेते पॉलिव्हरे यांनी धार्मिक समुदायाला अशा प्रकारे लक्ष्य करण्याचा निषेध केला असून हा सगळा गोंधळ संपवण्याचं आश्वासन दिलं.

'कोणत्याही प्रकारचा हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही. प्रत्येकाला शांततापूर्ण मार्गाने निषेध नोंदवण्याचा अधिकार आहे. पण अशी गुन्हेगारी कृत्ये अस्वीकारार्ह आहेत. जे कुणी यात सहभागी असतील, त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल', अशी प्रतिक्रिया स्थानिक पोलीस प्रमुख निशन दुरईयापा यांनी दिली.