Coronavirus Study: कोरोना व्हायरस पसरु लागल्यापासुन त्याच्या प्रसाराशी संंबधित अनेक दावे समोर आले आहेत. काहींंच्या मते सेक्स (Sex) केल्याने, काहींंच्या मते एसी मधुन कोरोना पसरण्याचा जास्त धोका असल्याचे सांंगितले गेलेय पण आता स्वीडन च्या काही वैज्ञानिकांंनी असा काही दावा केलाय की जो ऐकुन विश्वास बसणं सुद्धा कठीण आहे.या वैज्ञानिकांच्या माहितीनुसार तुम्ही हॅप्पी बर्थडे टु यु (Happy Birthday To You) गात असताना सुद्धा कोरोना व्हायरस पसरु शकतो. अलिकडेच यासंदर्भात स्वीडन च्या बोफिंस येथे अभ्यास झाला, ज्यामध्ये एकाच वेळी अनेकांंनी हे बर्थडे सॉंग गायल्यास कोरोना पसरण्याचा धोका वाढतो असे निरिक्षण समोर आले. काय आहे हा नेमका दावा सविस्तर जाणुन घ्या... Sex मार्फत पसरू शकतो Coronavirus? COVID-19 बाधित रुग्णाच्या वीर्यात कोरोना विषाणू सापडल्याने संकटात भर पडण्याची शक्यता
हा दावा असाच वार्यावर केलेला नाही त्यासाठी वैज्ञानिकांंनी खास स्टडी सुद्धा घेतला होता. स्वीडन च्या लुंड विश्वविद्यालय (Lund University) मध्ये यासाठी 12 स्वस्थ गायकांंना बोलावण्यात आले होते याशिवाय दोन व्हायरस ने संक्रमित रुग्णांंना सुद्धा एकत्र गाण्यास सांंगण्यात आले. बिब्बीस पिप्पी पेट्टर (Bibbis Pippi Petter) नामक एक स्वीडिश गाणं यावेळी गायला सांंगण्यात आलं. यावेळी जे लाळेचे ड्रॉपलेट्स बाहेर पडत होते त्यातुन हा अभ्यास करण्यात आला आहे. निरिक्षणात बी आणि पी च्या उच्चारात अधिक ड्रॉपलेट्स बाहेर पडत असल्याचे दिसुन आले होते. पुढे याच आधारे हा प्रयोग हॅप्पी बर्थडे वर सुद्धा करण्यात आला. COVID19: कोरोना व्हायरस AC च्या वापराने अधिक पसरतो का? जाणून घ्या तज्ञांचे मत
वैज्ञानिकांच्या माहितीनुसार हॅप्पी बर्थडे टु यु गाताना अशा अक्षरांंचा उल्लेख अधिक होतो ज्यात तोंंड उघडते, उदाहरणार्थ ब,प, ट,य (वाटल्यास उच्चारुन पाहा). हे उच्चार करताना तोंंडातील थुंंकीचे ड्रॉपलेट्स बाहेर हवेत उडतात. परिणामी विषाणु पसरण्याचा धोका वाढतो असे सांंगण्यात आले आहे.