Guillain-Barre Syndrome | Representative Image (Photo Credits: Free Malaysia Today)

Pune Guillain-Barre Syndrome Cases: दिवसेंदिवस पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) या आजाराचा धोका वाढत असलेला दिसत आहे. या विकारामुळे शहरात दोन मृत्यू झाल्याची नोंद झाली असून, रविवारपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 100 च्या पुढे गेली आहे. फ्री प्रेस जर्नलने याबाबत वृत्त दिले आहे. मागील आठवड्यात पुण्यात  24 संशयित प्रकरणांची प्राथमिक ओळख झाल्यानंतर, संक्रमणामध्ये अचानक वाढ झाल्याची तपासणी करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने मंगळवारी रॅपिड रिस्पॉन्स टीम (आरआरटी) स्थापन केली होती. या तपासणीनंतर जीबीएसच्या एकूण रुग्णांची संख्या 101 वर पोहोचली आहे, ज्यात 68 पुरुष आणि 33 महिला अशा रुग्णांची ओळख पटली आहे. यापैकी 17 व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत. राज्य आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने रविवारी याबाबत माहिती दिली.

अहवालानुसार, 62 रुग्ण पुणे ग्रामीण, 19 पुणे महानगरपालिकेचे, 14 पिंपरी चिंचवड महापालिकेचे आणि 6 रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. पुढील संक्रमण टाळण्यासाठी, नागरिकांना उकळलेले पाणी पिणे, ताजे-स्वच्छ आणि व्याव्स्ठीत्न शिजवलेले अन्न खाणे, तसेच शिजवलेल्या आणि न शिजवलेल्या पदार्थांचे मिश्रण टाळण्याचा सल्ला दिला जात आहे. ९हेहि वाचा: Long Covid Risk In Women: पुरुषांच्या तुलनेत महिलांना दीर्घकाळ कोविड होण्याचा धोका 31 टक्क्यांनी जास्त; अभ्यासात खुलासा)

गुइलेन-बॅरे सिंड्रोमची लक्षणे-

पायांमध्ये अशक्तपणा

शरीरात थकवा येणे, चेहऱ्याच्या हालचालींमध्ये समस्या येणे, डोळे हलवण्यास त्रास होणे.

वेदनेसह खाज सुटणे, लघवीवर नियंत्रण नसणे

अर्धांगवायूमुळे पाय, हात किंवा चेहऱ्याच्या स्नायूंवर परिणाम होऊ शकतो.

एक तृतीयांश प्रकरणांमध्ये श्वासोच्छवासावर परिणाम होऊ शकतो.

गंभीर प्रकरणांमुळे बोलणे आणि गिळणे प्रभावित होऊ शकते.

गुंतागुंत वाढल्यास श्वसनक्रिया बंद पडणे किंवा हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो.

गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे कारण-

ही एक जीवघेणी न्यूरोलॉजिकल स्थिती आहे आणि तो कोणत्याही वयात होऊ शकतो, परंतु तो सामान्यतः 30 ते 50 वर्षे वयोगटातील लोकांना प्रभावित करतो. तज्ञांच्या मते, गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे नेमके कारण माहित नाही, पण जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, बहुतेक प्रकरणे जंतुसंवेदनशील जीवाणू किंवा विषाणूंच्या संसर्गानंतर होतात. परिणामी, शरीरावरच रोगप्रतिकारक शक्तीचा हल्ला होतो. गुइलेन-बॅरे सिंड्रोम होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे कॅम्पायलोबॅक्टेर जेज्युनी या जीवाणूचा संसर्ग, ज्यामुळे मळमळ, उलट्या आणि अतिसार यांसारख्या लक्षणांसह गॅस्ट्रोएन्टेरिटिस होतो. कधी कधी, काही लसीही गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या जोखमीचे कारण होऊ शकतात, पण हे अत्यंत दुर्मिळ आहे.