अचाट कामगिरी; जोडप्याने एका वर्षात कमी केले तब्बल १७० किलो वजन
एलेक्सिस आणि डॅनी (Photo Credits- instagram)

 

वाढलेले वजन नियंत्रणात राहावे म्हणून किंवा प्रमाणाबाहेर वजनच वाढून नये यासाठी सतत कार्यरत असणाऱ्या उद्योगी मंडळींसाठी महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी वाचून कदाचित अनेकांना आश्चर्य वाटण्याची शक्यता आहे. काही मंडळी तर, 'छेss उगाच काहीही, असे कसे घडू शकते', असा काहीसा अविश्वासात्मक भवही चेहऱ्यावर आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण, असे घडले आहे खरे. लठ्ठपणाशी झुंजणाऱ्या इंडियाना स्थित एका जोडप्याने चक्क १७० किलो वजन कमी केले आहे. विशेष म्हणजे ही कामगिरी त्यांनी चक्क ३६५ दिवसांत म्हणजेच एका वर्षात केली आहे. आता बोला...

कहाणी आहे एलेक्सिस आणि डॅनी यांची. दोघेही एकमेकांना १० वर्षांपासून ओळखतात. २०१६मध्ये डॅनीने लेक्सीला लग्नासाठी मागणी घातली. ही बोलणी सुरु होती तेव्हा दोघेही अतिशय लठ्ठ होते. लठ्ठपणाशी लढा हा त्यांच्यातील समान दुवा होता. दरम्यान, त्यांनी लग्न केले. पण, खरा संघर्ष तर त्यानंतर होता. दोघांच्या वैवाहीक जीवनामध्ये लठ्ठपणामुळे अनेक समस्या येऊ लागल्या. त्यामुळे लठ्ठपणाशी यशस्वी लढा द्यायचा त्यांनी दृडशिश्चय केला. एक वर्ष त्यांनी कठोर मेहनत केली. ...आणि काय आश्चर्य त्यांचे वजन चक्क १७० किलोंनी कमीही झाले. (हेही वाचा, 40 शी नंतर वजन कमी करण्यासाठी खास '5' टिप्स !)

वजन घटविण्यासाठी एकत्र प्रयत्न

  • वजन कमी करण्यासाठी एकमेकांना प्रोत्साहीत केले. नियमितपणे व्यायाम करण्याचा संकल्प केला आणि तो तडीस नेला.
  • जिम जॉईन करतानाच त्यांनी आपल्या ट्रेनरला वजन कमी करण्याबाबत कल्पना दिली.
  • जिममध्ये दोघांनी मिळून वजन कमी करण्यासाठी आवश्यक व्यायाम केला.
  • लेक्सीचे वजन २२० किलो होते. हे वजन कमी करण्यासाठी लेक्सीने आपल्या आहारात व्हिटॅमिन 'ए' आणि 'सी' ची मात्रा वाढवली.
  • एकत्र जिम करण्यासोबतच दोघांनी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीही बदलल्या.
  • तंदुरस्त राहण्यासाठी दोघांनी तेलकट, तुपकट पदार्थांना फाटा देत हिरव्या पालेभाज्या, फळांचा वापर सुरु केला.