India's 52 Drug Samples Fail Quality Test: भारतातील 52 औषधांचे नमुने गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; यादीत Paracetamol चाही समावेश
Medicines प्रतिकात्मक प्रतिमा (Photo Credits-File Image)

India's 52 Drug Samples Fail Quality Test: भारतामध्ये जवळजवळ 52 औषधे ही निकृष्ट दर्जाची बनवली जात असल्याचे समोर आले आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच डीजीसीआयला (DGCI) औषधांच्या तपासणीत ही बाब आढळून आली आहे. नुकतेच 20 जून रोजी जारी करण्यात आलेल्या औषध अलर्टनुसार, एकूण 52 नमुने सीडीएससीओने घेतलेल्या गुणवत्तेच्या चाचणीत अपयशी ठरले आहेत. निकृष्ट आढळलेल्या औषधांमध्ये पॅरासिटामॉल 500 मिलीग्राम, बीपी औषध तेलमिसार्टन, कफ्टिन खोकला सिरप, एपिलेप्सी औषध क्लोनाझेपाम, वेदना औषध डायक्लोफेनाक, मल्टीविटामिन आणि कॅल्शियम औषधांचा समावेश आहे. ही अशी औषधे आहेत जी लाखो लोक वापरतात. बहुतेक लोक पॅरासिटामॉल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विकत घेतात. ही औषधे अत्यंत कमी दर्जाची बनवली जात असल्याचे डीजीसीआयने म्हटले आहे.

कॉस्मेटिक श्रेणीमध्ये समाविष्ट असलेल्या हिना मेहंदीचा दर्जा अतिशय खराब असल्याचे समोर आले आहे. औषधांच्या गुणवत्तेशी संबंधित ही तपासणी अशा वेळी झाली आहे, जेव्हा परदेशात भारतीय कफ सिरपमुळे लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशननुसार देशातील या औषधांचे नमुने मे महिन्यात घेण्यात आले होते. हे नमुने गुजरातमधील वाघोडिया, हिमाचल प्रदेशातील सोलन, राजस्थानमधील जयपूर, उत्तराखंडमधील हरिद्वार, हरियाणातील अंबाला, आंध्रमधील हैदराबादसह अन्य ठिकाणांहून घेण्यात आले आहेत. निकृष्ट आढळलेल्या पॅरासिटामॉलचा नमुना अस्कॉन हेल्थकेअर, उज्जैन येथून घेण्यात आला होता. (हेही वाचा: Ayushman Bharat Scheme: आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आता 70 वर्षांवरील वृद्धांनाही मिळणार मोफत उपचार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय)

पहा पोस्ट-