हृदयविकार (Photo Credits: Facebook)

गेले काही दिवसांत ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे अनेकांचा अचानक मृत्यू झाल्याच्या विविध घटना कानावर पडताना दिसत आहे. कुणाचा लग्न समारंभात तर कुणाचा मंदिरात, नाचताना, खेळतांना अचानक ह्रदयविकाराचा झटका येवून मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे.तसेच उच्च रक्तदाब किंवा संबंधीत कुठलाही अजार नसताना अनेकांना ह्रदविकाराचा झटका आल्याने मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. तरी या प्रकाराच्या ह्रदयविकाराचं प्रमाण तरुणांमध्ये अधिक आहे. देशभरातून या प्रकारच्या अनेक घटना पुढे आल्या आहेत. तरी अचानक वाढ झालेल्या या ह्रदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूमागे कोरोना विषाणू देखील जबाबदार असु शकतो असा धक्कादायक खुलासा एम्सच्या वरिष्ठ ह्रदयरोग तज्ञांकडून करण्यात आला आहे.

 

एम्समधील कार्डियोलॉजीचे प्रोफेसर डॉ. राकेश यादव म्हणाले, अचानक हार्ट अटॅकमळे होणाऱ्या मृत्यूंना लॉन्ग कोविडसोबत जोडलं जाऊ शकतं. हल्ली हार्ट अटॅकमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. मृत्यूचं प्रमाण वाढल्याचं ठोस कारण आणि डेटा उपलब्ध नाही. पण गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटना पाहाता याचा संबंध कोरोना महामारीशी असू शकतो, अशी शक्यता ह्रदयरोग तज्ञ यादव यांनी दर्शवली आहे. (हे ही वाचा:- Year Ender 2022: यावर्षी 'या' 5 आजारांनी केलं लोकांचं जीवन उद्ध्वस्त; 'या' आजाराच्या कहरामुळे सर्वाधिक मृत्यू)

 

२०२० ते २०२२ या दोन वर्षातील आकडेवारी बघता ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तरी यामागचं नेमक ठोस कारण काय ही अजूनही पुढे आलेलं नाही. तरी कोरोना महामारी हे त्यामागचं एक ठोस कारण ठरु सकतं असी शक्यता डॉ यादव यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे. तरी या मृत्यूंमागे नेमक कारण काय हे अजून तरी स्पष्ट सांगता येणार नाही तरी ह्रदयरोग तज्ञ यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.