COVID-19 Precautions of Cloths: बाहेरून घरी आलेल्या व्यक्तींनी 'अशा' पद्धतीने करा कपड्यांचे निर्जंतुकीकरण अन्यथा घरात होऊ शकतो विषाणूचा फैलाव
Cloth Sanitisation (Photo Credits: PixaBay)

देशात कोरोना व्हायरस (Coronavirus) विषाणूचा फैलाव इतक्या जलद गतीने वाढत चालला आहे देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 3 लाखांच्या वर जाऊन पोहोचली आहे. याला मूळ कराणा सोशल डिस्टंसिंगचे नियम योग्य रित्या पाळले न जाणे हे आहे. यामुळे लोकांमध्ये या विषाणूचा संसर्ग झपाट्याने होत आहे ज्याचा परिणाम कोरोना संक्रमितांची संख्येत वाढ होतोना दिसत आहे. देशभरात 30 जून पर्यंत लॉकडाऊन ठेवण्यात आला असला तरीही काही नियम शिथील करत अनलॉक 1 (Unlock 1) सुरु करण्यात आले आहेत. यात सम विषम मध्ये दुकाने सुरु झाली आहेत तर मोजक्या कर्मचा-यांच्या उपस्थितीत काही कार्यालये सुरु करण्यात आली आहेत. यामुळे लोक हळूहळू घराबाहेर पडू लागली आहेत. अशा लोकांनी घरी गेल्यावर आपले व आपल्या कपड्यांचे योग्य रित्या निर्जंतुकीकरण (Cloth Sanitisation) करणे गरजेचे आहे.

तुम्ही कुठून बाहरेून घरी आल्यानंतर सर्वप्रथन तुमच्या चप्पल योग्य ठिकाणी ठेवाव्यात. त्यानंतर कोणालीही स्पर्श न करता थेट बाथरूम मध्ये जावे. तुम्ही घातलेल्या कपड्यांना डायरेक्ट धुवायला किंवा वॉशिंग मशीनला न टाकता त्याआधी खाली दिलेली महत्त्वाची गोष्ट करावी. Home Cleaning & Disinfecting Tips: जंतूंना ठेवा तुमच्या स्वीट होम पासून दूर; घर निर्जंतूक करण्यासाठी वापरा हे सोप्पे नैसर्गिक पर्याय

बाहेरून घरात आल्यानंतर बाथरूम मध्ये तुम्ही घातलेले/वापरलेले कपडे गरम पाण्यात 2-3 थेंब निर्जंतुकीकरण लिक्विड ( डेटॉल, सॅवलॉन इ.) जंतुनाशक औषधं एका बादलीत टाकून त्यात तुमचे हे कपडे 10 मिनिटे भिजत ठेवावे. त्यानंतर नेहमीप्रमाणे तुमचे कपडे धुणे गरजेचे आहे. कारण असे केल्यास तुमच्या कपड्यांवरील जंतु नष्ट होतील आणि तुमच्या कपड्यांमुळे कोणालाही विषाणूचा फैलाव होणार नाही.

पावसाळा ऋतू सुरु झाला असला तरीही शक्यतो तुमचे कपडे उन्हात चांगले वाळवा. रॅकवरून काढताना ते ओलसर नाहीत ना ह्याची खात्री करा. असे केल्याने कोणत्याही संसर्गास कारणीभूत असलेल्या जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध होतो.