आपल्या घरात शक्यतो ओव्याचा वापर पूरी,पराठे, कोशंबीर मध्ये त्या पदार्थांची चव वाढवण्यासाठी टाकण्यासाठी केला जातो. परंतु भाजी किंवा कोशिंबीर बनवण्यासाठी उपयुक्त अशा या वनस्पती च्या लहान बियांमध्ये असे फायदेशीर घटक आहेत जे आपल्यातील बऱ्याच लोकांना माहीत नाहीत. अपचन झाल्यास आई आपल्याला वारंवार गरम पाणी आणि मीठासह ओवा खाण्याचा सल्ला देते. एवढेच नाही तर थंडी, वाहणारे नाक आणि सर्दीपासून मुक्त होण्यासाठी ओवा निश्चितच एक औषध आहे.आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत ओव्याचे पाणी पिल्यास आपल्याला कोणकोणते फायदे होतील. चला तर मग जाणून घेऊयात. (Kokum Health Benefits: कोकमाचे सेवन केल्याने होतात हृदय निरोगी करण्यापासून ते वजन कमी करेपर्यंतचे अनेक फायदे जाणून घ्या सविस्तर )
पोटाच्या आजारांपासून मुक्तता
पोटाच्या अनेक आजारांसाठी ओवा एक रामबाण उपाय आहे . हे घेतल्यामुळे पोटदुखी, गॅस, उलट्या, आंबट डोकेदुखी आणि आंबटपणापासून मुक्तता मिळते. ओवा , काळे मीठ ,वाळलेले आले आणि चूर्ण तयार करा. अन्न खाल्ल्यानंतर हे चुरण घेतल्यास आंबट ढेकर आणि गॅसची समस्या दूर होते. फक्त एवढेच नाही, जर आपल्याला डाइजेशन ची समस्या दूर करायचे असेल तर ओव्याशिवाय चांगला उपाय असूच शकत नाही.
वजन कमी करण्यास फायदेशीर
ओवा वजन कमी करण्यासाठी ही खुप फायदेशीर आहे. ओव्याचे पाणी पिल्याने मेटाबॉलिज्म वाढते त्यासाठी रात्री एक ग्लास मध्ये पाणी आणि ओवा भिजत ठेवा.सकाळी त्यात थोडे मध मिसळून ते पाणी प्या.या पाण्याचा उपयोग लवकर वजन कमी करण्यासाठी होतो.
सर्दी आणि खोकल्यापासून मुक्तता
जर आपला खोकला बरा होत नसेल तर ओव्याचे पाणी पिल्यास फायदा होईल. यासाठी पाण्यात मओव्याचे दाणे उकळू घ्या त्यात त्यात काळे मीठ मिसळा आणि ते पाणी प्या हे पाणी पिल्यास आराम मिळेल.
हिरड्यांना आलेली सूज कमी करते
हिरड्या सुजत असल्यास कोमट पाण्यात काही थेंब ओव्याचे तेल टाकल्यास आराम मिळेल. याव्यतिरिक्त ओवा भाजून त्याची पावडर करुन घ्या आणि ते लावा याने ब्रश केल्याने हिरड्यांची वेदना आणि सूज दूर होण्यास मदत होते.
मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना दूर करते
मासिक पाळी दरम्यान बर्याच स्त्रियांना त्यांच्या कंबरमध्ये आणि खालच्या ओटीपोटात तीव्र वेदना होतात. अशा परिस्थितीत कोमट पाण्याबरोबर ओवा खाल्यास आराम मिळतो.
(टीप- या लेखात दिलेल्या सर्व माहिती केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिलेली आहे. कोणत्याही रोगाच्या उपचारांसाठी याकडे वैद्यकीय सल्ला म्हणून पाहू नये. आम्ही याचा दावा करीत नाही की, लेखात दिलेली माहिती तुमच्या सर्व समस्यांवर प्रभावी ठरेल. लेखात दिलेल्या कोणत्याही टिपा किंवा सूचना अंमलात आणण्यापूर्वी कृपया डॉक्टरांशी सल्लामसलत करा)