Black Grapes Health Benefits: द्राक्ष हे एक रसाळ फळ आहे. जे सर्वांनाचं आवडते. बाजारामध्ये आपल्याला वेगवेगळ्या रंगाचे द्राक्ष दिसतील. आज या लेखातून आपण काळ्या द्राक्षाचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत. काळ्या द्राक्षांमध्ये ग्लूकोज, मॅग्नेशियम आणि लिंबाच्या रसामध्ये सापडणारे आम्ल यासारखे पुष्कळ पोषक घटक असतात, जे शरीराला बर्याच रोगांपासून वाचविण्यात मदत करतात. काळ्या द्राक्षात असलेले अँटीऑक्सिडेंट हृदयविकाराचा झटका, रक्त जमणे यासारख्या समस्यांना प्रतिबंधित करते. काळ्या द्राक्षे हृदयरोगाशी लढा देण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. हे द्राक्ष कोलेस्टेरॉल नियंत्रित करते. जर आपण लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त असाल, तर द्राक्ष हा आपल्यासाठी सर्वोत्तम आहार आहे. काळे द्राक्षे आरोग्यासाठी प्रत्येक दृष्टीने फायदेशीर आहेत. (वाचा - Best Breakfast: सकाळी नाश्त्यामध्ये 'या' 5 पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यास रहाल दिवसभर फिट)
काळ्या द्राक्षेमुळे रक्तामध्ये इन्सुलिन वाढते -
द्राक्षाचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर आहेत. काळ्या द्राक्षांमध्ये रेव्हेरॅटल नावाचा पदार्थ असतो. जो रक्तामध्ये इन्सुलिन वाढवितो. ज्यामुळे साखरेची पातळी नियंत्रित होऊ शकते. (वाचा - Heart Health Tips: हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत 'हे' दोन पदार्थ; आहारात काळजीपूर्वक वापर करा)
काळ्या द्राक्षामुळे स्मरणशक्ती वाढते -
काळ्या द्राक्षाच्या सेवनाने स्मरणशक्ती वाढते. आपणही आपली स्मरणशक्ती चांगली बनवू इच्छित असल्यास आपल्या आहारात काळ्या द्राक्षाचा समावेश करा. द्राक्षाच्या सेवनाने आपल्या स्मरणशक्तीत वाढ होते.
काळ्या द्राक्षामुळे रक्तामध्ये इन्सुलिन वाढते -
काळे द्राक्ष मधुमेहाच्या रुग्णांना फायदेशीर ठरतात. काळ्या द्राक्षांमध्ये रेव्हेरॅटल नावाचा पदार्थ असतो. जो रक्तामध्ये इन्सुलिन वाढवितो, ज्यामुळे साखरेची पातळी नियंत्रित होऊ शकते.
काळे द्राक्षे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवतात -
काळ्या द्राक्षेच्या सेवनाने कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवली जाऊ शकते. काळ्या द्राक्षात सायटोकेमिकल्स असते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.
केसांसाठी सर्वोत्तम टॉनिक -
केसांमध्ये कोंडा असल्यास किंवा केस पांढरे झाल्यास तसेच केस खूप गळत असल्यास काळे द्राक्षाचे सेवन करा. काळ्या द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन ई असते, जे केसांच्या आरोग्यासाठी चांगले असते.
वजन नियंत्रित करते -
जर आपण वाढत्या वजनाने त्रस्त असाल तर काळ्या द्राक्षे खा. त्यामध्ये अँटीऑक्सिडेंट असतात, जे शरीरातून वाईट विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात.