Benefits of Ginger: आयुष मंत्रालय नागरिकांच्या आरोग्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या रेसीपीच सूचवत असते. एखादा काढा, पेय, पदार्थ किवा आणखी काहीतरी. या वेळी आयुष मंत्रालयाने नागरिकांना आलेपाक म्हणजेच आदरक बर्फी (Adrak Barfi) खाण्याचा सल्ला दिला आहे. आयुष मंत्रालयाने ही रेसीपी सुचवताना त्याचे फायदेही नागरिकांना सांगितले आहेत. इतर ऋतूंच्या तुलनेत खास करुन थंडीच्या दिवसांमध्ये आल्याचे महत्त्व अधिक वाढते. ज्यामुळे सर्दी, खोकला आदी किरकोळ आजारांपासून आराम मिळतो. आलेपाकमध्ये आल्याचे सर्व गुण समाविष्ट असतात. जाणून घ्या आलेपाक किंवा आदरक बर्फी (Benefits of Adrak Barfi) खाण्याचे फायदे.
आदरक पाक खाण्याने पचनक्रिया सुधारते. यात जिंजरोल असल्याने व्हायरल इन्फेक्शन (संसर्ग) धोका कमी होतो. शरीरात एंटीऑक्सीडेंट वाढते. चक्कर येणे, मॉर्निंग सिकनेस यांसारख्या समस्या कमी होतात. काही अभ्यासांतून पुढे आले आहे की, यात वेटलॉस प्रॉपर्टीही असते. जी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असते. शरीरातील सांधेदुखी कमी करते. एंटीबॉडीज क्वालिटीजमुळे शरीरातील शुगर लेवल कमी होते. आले खाल्याने पोटही लवकर साफ होते. शरीरातील नको असलेली चरबीही नियंत्रणात ठेवण्याचे काम आल्यामुळे होते. ज्यामुळे विविध आजारांचा धोका कमी होतो. आले बुद्धी आणि आरोग्यास फायदेशीर असते. मेंदूशी संबंधीत आजार कमी करण्यास बरेच प्रभावी ठरते. खास करुन क्रोनिक इंफ्लिमेंशन वैगरे. (हेही वाचा, Ginger Water Benefits: वजन कमी करणे ते मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त आहे आल्याचे पाणी, जाणून घ्या फायदे)
ट्विट
Ardraka Paka is a delicious & nutritious snack that helps in improving appetite & digestion. It is also useful in prevention & management of sore throat, cold & cough.#Ayush #AmritMahotsav
Source: Traditional Food Recipes from Ayush Systems of Medicine pic.twitter.com/2grL3n9wM1
— Ministry of Ayush (@moayush) January 7, 2022
आपण कोणत्याही प्रकारे आल्याचे सेवन करु शकता. जसे की, चहा, भाजी, पराठा, लोणचे किंवा चटणीत टाकून. सर्व प्रकारचे आले आरोग्यासाठी फायदेशीर असते. मात्र अल्याचे सेवन अधिक प्रमाणात केल्यास शरीरातील उष्णता वाढू शकते.
वाचकांसाठी सल्ला/टीप: वर दिलेला सर्व मजकूर केवळ माहितीसाठी आहे. ही अत्यंत प्राथमिक स्वरुपाची माहीती आहे. ही माहिती कोणत्याही आजारावरील उपाय सूचवत नाही. या माहितीचा वापर जीवनात प्रत्यक्ष करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला जरुर घ्या. लेटेस्टली मराठी या माहितीची पुष्टी करत नाही. तसेच, या मजकूराची जबाबदारी स्वीकारत नाही.