लग्नानंतर अनेकदा महिलांना त्यांच्या फिटनेसकडे (Fitness) लक्ष देता येत नाही. त्या घरच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यात एवढ्या व्यस्त होतात की त्यांना स्वत:कडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही.  गर्भधारणेनंतर (Pregnancy) तर विचारचं करु नका कारण गर्भधारनेनंतर स्त्रियांना त्यांच्या जुन्या आकारात परत येणे फारच अवघड असतं. तथापि, बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) किंवा काही बिझनेस वूमन (Business) प्रसुनंतरही स्वतचं बॉडी फिटनेस (Fitness) कायम ठेवतात. पण सर्वसामान्य स्त्रीयांच्या बाबतीत असं होताना दिसत नाही कारण त्यांच्यावर घरगूती कामाचा बोजा तसेच पाल्ल्याची (Parenthood) जबाबदारी असते. पण अशाचं एका सर्वसामान्य घरातील स्त्रीने प्रसुतिनंतर फक्त वजनचं कमी केलं नाही तर बॉडी बिल्डिंग कॉम्पिटीशन (Body Building Competition) देखील जिंकली.

 

बॉडी बिल्डिंग क्वीन (Body Building Queen) एक नाही तर दोन मुलांची आहे आणि तिचं नाव अंजू मिना (Anju Meena) असं आहे. अंजू मीना एक गृहिणी आहे आणि बॉडीबिल्डर (Body Builder) आहे. प्रसूतीनंतर अंजूचं वजन 72 किलो झालं होत. वजन कमी करण्यासाठी हताश होऊन तिने भात कमी केला, लिंबू आणि मधाचे पाणी (Lemon Honey Warm Water) पिण्यास सुरुवात केली आणि अनेक पथ्ये पाळली. त्यानंतर तिने घरीचं व्यायाम करायला सुरु केली. अंजूला इतर लोक म्हणायचे तु जशी आहेस तशी उत्तम आहेस तुला लग्न झाल्यावर, दोन मुल झाल्यावर वजन कमी करायची काय गरज. तिच्या संपूर्ण कुटुंबियांचा ती करत असलेल्या व्यायामाल विरोध होता. पण एकदा ठरवलं ते ठरवलं. घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून अंजूने घरच्या घरी डंबेल आणि रेझिस्ट मागवतन्स रात्रीच्या व्यायामाला सुरुवात केली. (हे ही वाचा:- World Tourism Day: आज जागतिक पर्यटन दिवस, जाणून घ्या महाराष्ट्रातील ‘ती’ पर्यटन स्थळ जी पहायला थेट परदेशातून पर्यटक येतात)

 

याप्रकारे लांब काळ प्रयत्न केल्यानंतर तिचे वजन हळूहळू कमी होऊ लागले आणि त्याच्या शरीर रचनेत मोठा फरक पडला. या प्रवासानंतर अंजूमध्ये व्यायामाची आवड निर्माण झाली आणि त्यानंतर तिने जिममध्ये जाऊन वेट ट्रेनिंग करायला सुरुवात केली. आता अंजूचे वजन ४७ किलो आहे म्हणजे या प्रेरणादायी प्रवासात अंजूने 25 किलो वजन कमी केलं. एवढचं नाही तर यानंतर अंजूने वेट लिफ्टींग कॉम्पिटिशनही जिंकली.