Hernia चं ऑपरेशन करायला गेलेल्या 67 वर्षीय पुरूषाच्या शरीरात आढळले Uterus, Fallopian Tube हे स्त्रियांचे  Sexual Organs!
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

Kosovo येथील 67 वर्षीय एका पुरूषाच्या शरीरात स्त्रियांचे प्रायव्हेट पार्ट्स निर्माण झाल्याचं आढळलं आहे. दरम्यान सुरूवातीला त्याला पायाजवळील ही गाठ हर्निया असल्याचं सांगत त्यानुसार उपचार सुरू करण्यात आले होते मात्र नंतर डॉक्टरांना जे आढळलं ते अचंबित करणारं होतं.

डेली स्टार ने New York Post,च्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, पुरूषाच्या शरीरात Uterus हे पेअर च्या आकारामध्ये होते. सोबतच Cervix, Fallopian Tube आणि Ovary देखील होती तर Testicle गायब झालेले होते. हे देखील नक्की वाचा: Shocking! लिंग पुरुषाचे असूनही गर्भाशय असल्याने अल्पवयीन मुलगा गरोदर .

पुरूषाला त्याच्या शरीरात रहस्यमय गाठ केवळ तो खोकताना किंवा उभं असल्यावरच आढळत होती. झोपलेल्या अवस्थेत त्याला ती जाणवत नसे. या पुरूषाला Persistent Mullerian duct syndrome चं निदान करण्यात आले आहे. या अत्यंत दुर्मिळ केस आहेत. ज्यामध्ये पुरूषाच्या शरीरात स्त्रियांची जननेंद्रिय आढळतात. आतापर्यंत वैद्यकीय इतिहासामध्ये केवळ 200 जणांवर अशी कंडिशन आढळली आहे. University of Prishtina च्या जर्नल मध्ये हे प्रकरण Urology Case म्हणून नोंदवण्यात आले आहे.

US National Library of Medicine च्या माहितीनुसार, खालच्या बाजूला झुकलेले टेस्टिस्ट (cryptorchidism)किंवा सॉफ्ट inguinal hernias हे या सिंड्रोमचं साधारण लक्षण आहे. हे तेव्हा होतं जेव्हा Müllerian duct हा पुरूषांच्या शरीरात वाढीदरम्यान ब्रेक डाऊन होनं अपेक्षित असतं पण तसं होत नाही.