Viagra Overdose: व्हियग्रा घेणं पडलं महागात, पुरुषत्व सिध्द करण्याच्या नादात तरुणाने गमावला जीव
Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

नागपूर (Nagpur) लगतच्या सावनेरमध्ये (Saoner) एका विचित्र घटनेत तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. प्राथमिक तपासात व्हियग्राच्या अतीसेवनाने तरुणाचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. मृत तरुणाचे वय 25 वर्ष असुन त्याचे नाव अजय परतेकी (Ajay Parteki) आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय त्याच्या मैत्रिणीबरोबर रविवारी सायंकाळी सावनेर येथील केशव लॉजमध्ये गेला होता. संभोग दरम्यान, अजय खाली कोसळला आणि खोलीत बेशुद्ध पडला.

या घटनेने घाबरलेल्या अजयच्या मैत्रीणेने त्यांच्या कॉमन फ्रेंडला फोन केला आणि संबंधीत घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली. अजयच्या त्या मित्राने घटनेबाबत पोलिसांना कळवले. पोलिसांनी सावनेर मधील केशव लॉज (Keshav Lodge) गाढत ताबडतोब तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान अजयच्या शरीरावर कुठल्याही प्रकारच्या जखमा किंवा खुणा आढळून आल्या नाहीत. मात्र, त्याच्या खिशात व्हायग्राच्या गोळ्या होत्या. प्रथमदर्शनी, पोलिसांना संशय आला की व्हायग्राच्या (Viagra) अतिसेवनामुळे अजयचा मृत्यू झाला असावा. (हे ही वाचा:-EasyCheck Breast: रक्ताच्या चाचणीतून ब्रेस्ट कॅन्सरचं निदान करणारी चाचणी आता भारतामध्ये उपलब्ध)

हल्ली व्हियाग्राची बाजारात जोरदार विक्री होताना दिसते. तरुणांची याबाबतीत मोठी क्रेझ बघायला मिळते. पुरुषांच्या मते सेक्स पॉवरसाठी व्हियग्रा अत्यंत सहजरित्या उपलब्ध असलेला मार्ग आहे. परंतु, त्याचे अनेक दुष्परिणामही आहेत, तरी त्याकडे दुर्लक्ष करु नये. डॉक्टरांच्या (Doctor) सल्ल्याशिवाय अशा कुठल्याही वस्तुचं सेवन करणं हानीकारक ठरु शकत.

अजय परतेकीच्या मृत्यू प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. परतेकी कुटुंब आणि अजयच्या मित्रपरीवारावर शोककळा पसरली आहे. अवघ्या 25 वर्षाच्या अजयच्या झालेल्या अशा विचित्र मृत्यूमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.