Happy Holi 2019 (Photo Credits- Twitter)

होळी (Holi) खेळताना बेधुंद होऊन आनंद साजरा करावा.. तुम्हीही केला असेलच हो ना? पण त्याच्यानंतर कपड्यांवर राहिलेले रंग मात्र डोक्याला ताप ठरू शकतात. होळी साठी जरीही नैसर्गीक रंग वापरले तरी त्यांचा मारा इतका जास्त केला जातो की हे डाग हमखास कपड्यांवरून असून राहतात, म्ह्णूनच अनेकदा होळी साठी जुने किंवा अगदी फेकून द्यायचे कपडे वापरण्यात येतात. पण या डागांच्या भीतीने जुने कपडे वापरण्याची काहीच गरज नाही. तुम्ही स्टायलिश कपडे घालून होळी साजरी करावी आणि नंतर हे कपडे अगदी सोप्प्या टिप्स वापरून स्वच्छ करावे यासाठी आम्ही आज हा लेख घेऊन आलो आहोत. अगदी कुठल्याही दुकानात मिळणाऱ्या साध्या वस्तूंचा वापर जरून तुम्ही होळीचे डाग कपड्यांवरून (Stains On Clothes)  हटवू शकाल.. कसं ? चला तर जाणून घेऊयात..

होळीचे कपडे धुवायला घेण्याच्या आधी ते काही वेळ पाण्यात भिजवून ठेवावे, किंचित कोमट पाणी असेल तर डाग निघायला मदत होते. शक्य असल्यास हे उपाय आधी कपड्याच्या एखाद्या भागावर ट्राय करून पहा ज्यामुळे तुमची खात्री होईल आणि कपडे थेट खराब होणार नाहीत. Holi 2020: होळीचे रंग त्वचा आणि केसांमधून काढण्यासाठी 'या' घरगुती पद्धतींचा करा वापर, जाणून घ्या Home Remedies

ब्लीच

आला किंवा नॉन क्लोरीन ब्लीच मिसळून कपडे धुवावेत. कपडे धुताना वेगळे धुवा. त्यामुळे दुसऱ्या कपड्यांना रंग लागणार नाही.

व्हाईट व्हिनेगर

अर्धा कप व्हाईट व्हिनेगर १ टीस्पून डिटर्जंट मिसळून त्यामध्ये सुमारे २ लीटर पाणी घ्या. यात कपडे भिजवून मग चोळून धुवा. यामधील ऍसिड रंग काढायला मदत करतो.

लिंबाचा रस

लिंबामध्ये अॅसिडिक गुणधर्म असतात, जे कपड्यांवरील न जाणारे डाग घालवण्यासाठी फायदेशीर ठरतात. होळीच्या रंगांच्या डागावर 15-20 मिनिट्स लिंबाचा रस लावून ठेवा. त्यानंतर तुम्ही तो डाग हाताने हळूवारपणे घासा. ब्रश लावू नका.

विंडो क्लिनर

विंडो क्लिनर अथवा अमोनिया बेस्ड स्प्रे तुम्ही होळीच्या रंगांच्या डागांवर मारा. हे साधारण कपडे स्प्रे मारल्यानंतर 15-20 मिनिट्स तसेच ठेवा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने हे कपडे धुवा.ही डाग घालवण्याची सर्वात सोप्पी पद्धत आहे.

अल्कोहोल

डायल्युट न केलेले अल्कोहोल अथवा मेथेलेटेड स्पिरीट (methylated spirits) या कपड्यांवर स्प्रेड करा. काही वेळ कपडे तसेच ठेवा. कपडे हलक्या हाताने चोळून स्वच्छ करा.

(टीप - वरील सल्ले हे केवळ माहितीसाठी देण्यात आले आहेत. स्वतःच्या जबाबदारीने याचा प्रयोग करून पाहावा)