Hair Fall Tip: केसांची गळती थांबवायची आहे? घरीच 'या' पद्धतीने समस्येपासून सुटका मिळवा
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

बहुतांश महिलांना केस गळतीचा समस्या जाणवते. यासाठी महिला केसांवर विविध उपाय करतात. मात्र तरीही केस गळतीची समस्या काही कमी होत नाही. मात्र जर तुम्ही घरगुती आणि नैसर्गिक पद्धतीने केस गळतीची समस्या सोडवायची असल्यास या मार्गाचा अवलंब करा.

मेथी (Fenugreek Seeds)  हे केस गळतीवर उत्तम घरगुती उपाय असून त्याचा परिणाम दिसून येतो. तसेच मेथीचा उपयोग केसांवर केला असता पांढरे झालेले केस, फाटे फुटणे यावरसुद्धा उपयोगी पडते. तर जाणून घ्या मेथी कशाप्रकारे केस गळती समस्येपासून सुटका मिळवून देते.

-मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते दह्यात मिसळून त्याची एक पेस्ट बनवा. तयार केलेले हे मिश्रण केसांना एक तासभर तरी ठेवा. यामुळे केस गळणे आणि केसामधील कोंडा काढण्यासाठी मदत होते.

-मेथीचे दाणे वाटून त्यात नारळाचे तेल मिसळा. त्यानंतर एका तास ही पेस्ट केसांना लावून ठेवा. केसांना लावलेली ही पेस्ट धुवून टाका. यामुळे केस गळती काही दिवसानंतर थांबण्यास मदत होईल.

-मेथीचे दाणे पाण्यात उकळून घ्या. उकळलेले हे मेथीचे पाणी थंड झाल्यानंतर ते एका स्प्रे बॉटलमध्ये भरुन ठेवा, त्यात तुम्ही कांद्याचा रस सुद्धा तुम्ही मिक्स करु शकता. तयार केलेले हे पाणी केसांच्या मुळाशी स्प्रे करा.(केस गळणे कमी करण्यास मदत करतील हे 5 हेल्दी ज्यूस)

तसेच मेथीचे दाणे तुम्ही सुक्या आवळ्यासोबत वाटून त्याची पावडर बनवू शकता. त्यानंतर ही पावडर तेलामध्ये मिक्स करुन ते केसांना लावा. यामुळे सुद्धा केसांची गळती थांबण्यास मदत होईल.

(सूचना: वरील आर्टीकलचा उद्देश हा माहिती देणे हा आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे.)