फिटनेस फोटोग्राफर आकाश कुंभार करणार लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड
आकाश कुंभार (Photo credit : Facebook)

Limca Book of Records : वेगवेगळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या इंटरनॅशनल स्पोर्ट्स फोटोग्राफर आकाश कुंभार (Akash Kumbhar) लवकरच 10 तास 45 मिनीटांमध्ये 400 मॉडेल्सचे 11,000 फोटो काढण्याचा लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी विक्रम नोंदवणार आहेत. 2018 मध्ये एशिया आणि मीडलइस्टच्या वॉव अवॉर्ड्सने आकाशचा आउटस्टॅंडिग फॅशन फोटोग्राफर हा सन्मान देऊन गौरव केला होता. ‘बी’ ह्या आंतरराष्ट्रीय लाइफस्टाइल मॅगजीनच्या कवरपेजसाठी तीनदा फोटोशूट केलेला आकाश फॅशनवल्डमधले एक मोठे नाव आहे.

सूत्रांच्या अनुसार, आकाशने आजवर अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय फॅशन डिझाइनर्ससाठी तसेच ग्लॅमरवल्डमधल्या आणि स्पोर्ट्सवल्डमधल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मॉडेल्ससाठी पोर्टफोलिओ शूट केले आहे. आजवर 100हून अधिक मॉडेल्सचे फोटोशूट केलेल्या आकाशने आता 12 जानेवारीला अवघ्या 11 तासांमध्ये 11,000 फोटो काढण्याचा विक्रम नोंदवण्याचे ठरवले आहे.

आकाश कुंभार आपल्या विक्रमाविषयी म्हणतो, “मी 2012पासून फिटनेस इंडस्ट्रीत काम करतोय. मी अनेक आंतरराष्ट्रीय किर्तीच्या मॉडेल्ससाठी फोटोशूट केले आहे. पण हे करताना भारतात फिटनेस फोटोग्राफीविषयी जागरूकता नसल्याचे मला जाणवले. मला हा विक्रम नोंदवून फिटनेस फोटोग्राफीविषयी जागरूकता आणायची आहे. फोटोग्राफीकडे व्यावसायिकष्टीने न पाहता, कलात्मक माध्यमातून नव्या पिढीने पाहावे, ह्यासाठी मी हा विक्रम नोंदवणार आहे.”