Yashwantrao Chavan Death Anniversary: यशवंतराव चव्हाण पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्र्याचे हे महत्त्वपूर्ण विचार
यशवंतराव चव्हाण ( Yashwantrao Chavan ) हे केवळ एक व्यक्ती नव्हते. तो एक विचार होता. थेट स्वातंत्र्य चळवळीत सहभाग आणि त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या आणि राज्याच्या उभारणीत यशवंतरावांचा मोठा हातभार आहे.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 36 वी पुण्यतिथी ( Yashwantrao Chavan Death Anniversary). यशवंतराव चव्हाण ( Yashwantrao Chavan ) हे केवळ एक व्यक्ती नव्हते. तो एक विचार होता. थेट स्वातंत्र्य चळवळीत सहभाग आणि त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या आणि राज्याच्या उभारणीत यशवंतरावांचा मोठा हातभार आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री राहिलेल्या यशवंतरावांना देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी दिल्लीला बोलवून घेतले. त्यांच्यावर संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी सोपवली. पुढे यशवंतरावांकडे केंद्रात उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री या पदांची जबाबदारी आली. ती त्यांनी समर्थपणे पेलली. ते आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही राहिले. अशा या यशवंतरावांची आज 36 पुण्यतीथी. यशवंतरवांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचेह हे काही महत्त्वपूर्ण विचार. (Yashwantrao Chavan Thoughts)
- आपल्या विचारांची अधिशाळा समाजातील प्रत्येक व्यक्तिच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास हिच असली पाहिजे.
- समाजाच्या विकासासाठी, लोकांच्या जीवनातील दारिद्र्य दूर करण्यासाठी आपण विकासाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. परंतू, हा कार्यक्रम हाती घेताना आपण राजकीय विचारांचे ज्ञानही अद्ययावत ठेवले पाहिजे. आपण राबवत असलेल्या विकासयोजना या कोणासाठी आहेत याचा आपण सातत्याने विचार केला पाहिजे.
- कोणताही राजकी पक्ष निष्ठेने चालत असतो. हे खरे असले तरी लोकशाही पक्ष हे नेहमी विचारांच्या निष्ठेनेच चालले पाहिजेत. त्यासाठी तुम्ही-आम्ही नेहमी आग्रही राहिले पाहिजे. विचारांवर निष्ठा असायला पाहिजे. ज्या निष्ठा व्यक्तीवर असतात त्या चुकीच्या असतात. कारण व्यक्ती चुकली की निष्ठाही चुकीच्या ठिकाणी जाते. (हेही वाचा, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या त्यांच्या संघर्षाचा इतिहास)
- लोकशाहीत जनताच राजा आहे. हे आपण जनतेला वारंवार सांगायला हवे. आणि जनतेच्या जीवनावर सुखाची सावली निर्माण करण्यासाठी प्रत्येक माणूस, लहान मूल यांना एक सावली देणारे झाड समजून त्याला खतपाणी घालायला हवे.
- आपण देशाच्या आर्थिक उन्नतीसाठी आपण जे तत्व स्वीकारले आहे ते आपल्याला टाळता येणार नाही. ज्या दिवशी आपण हे तत्व विसरु, त्याचा त्याग करु त्या दिवशी देशाच्या संरक्षणाच्या प्रश्नांची धुळधाण होईल हे आपण नक्की मानले पाहिजे. त्यामुळे आपण सतत जागृक राहायला हवे. परराष्ट्र धोरण, देशांतर्गत धोरण आणि आर्थिक निती यांचा मेळ सतत्याने ठेवायला हवा.
- सहकार चळवळीत आर्थिक सत्ता आहे. ही चळवळ ही एका अर्थाने पाहिल्यास सत्तेचे केंद्रच आहे. ज्या ठिकाणी सत्तेचे केंद्र असते त्या ठिकाणी जनतेने त्यावर लोकशाही मार्गाने अंकूश ठेवायला पाहिजे. त्याबाबतची जाणीव लोकांमध्ये निर्माण केली पाहिजे.
दरम्यान, यशवंतराव चव्हाण हे केवळ राजकारणीच नव्हते. ते चांगले वक्ते, साहित्यीकही होते. चळवळीतून आल्याने त्यांना समाजकार्याची मोठी जाण होती. त्यांच्या लोकसंपर्क दांडगा होता. तळागाळातील जनता ते मोठमोठे कलावंत, विचारवंत आणि देशविदेशातील उत्तम राजकारणी, नेते यांच्याशी त्यांचे उत्तम संबंध होते.
(The above story first appeared on LatestLY on Nov 25, 2020 09:53 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

