
World Sanskrit Day HD Images 2021: संस्कृत शब्द ऐकताच आपल्याला सर्वात प्रथम मंत्र आठवतात. पूजेमधील असे काही मंत्र किंवा श्लोक जे आपल्याला बालपणासूनच शिकवले जातात आणि त्यांच्यासोबत आपले एक वेगळे नाते निर्माण होते. या व्यतिरिक्त संस्कृताबद्दल आपल्याला अधिक काय माहिती आहे याबद्दल आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो. सध्या संस्कृत भाषा ही वैदिक पूजा, मंत्र, श्लोक आणि पौराणिक ग्रंथांपर्यंत सीमित राहिली आहे. परंतु आज सर्वत्र रक्षाबंधन, नारळीपौर्णिमेसह संस्कृत दिन सुद्धा साजरा केला जाणार आहे. संस्कृत भाषा ही जगातील एक सर्वाधिक प्राचीन भाषा आहे. भारतात संस्कृत भाषेला सर्व भाषांची जननी असल्याचे मानले जाते. भारतात प्राचीन काळापासूनच संस्कृत भाषा बोलली जात आहे. याला देववाणी किंवा सुरभारती आणि वैदिक भाषा असे सुद्धा म्हटले जाते.
संस्कृत दिवस हा प्रत्येक वर्षी श्रावणी पौर्णिमेला साजरी केला जातो. श्रावणी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन, या दिवशी ऋषींचे स्मरण किंवा पूजेसह भक्तीभावात तल्लीन होण्याचे पर्व असते. ऋषी हेच संस्कृत साहित्याचे स्त्रोत असल्याने श्रावणी पौर्णिमेला 'ऋषी पर्व' आणि 'संस्कृत दिवस' म्हणून ओळखले जाते. तर यंदाच्या जागतिक संस्कृत दिनामित्त Wishes, Messages, Facepost, WhatsApp Status आणि शुभेच्छापत्रं. (Raksha Bandhan 2021: रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ-बहिणीने चुकुनही करू नका 'ही' कामे, अन्यथा होऊ शकते अशुभ)





दरम्यान, संस्कृत भाषा ही सध्या सर्वाधिक कमी प्रमाणात बोलली जाते. मात्र हिंदू धर्मातील लोक आपल्या मुलांची नावे संस्कृत भाषेत ठेवण्यास पसंद करतात. त्यामुळे संस्कृत भाषा ही नावांसाठी नेहमीच अग्रेसर राहिली आहे.