रक्षाबंधन हा सण भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे. हा सण हिंदू धर्मात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी किंवा रक्षा सूत्र बांधतात. आणि कपाळावर टिळा लावून, त्याच्या आनंदी आणि समृद्ध जीवनासाठी प्रार्थना करतात. आणि भाऊ बहिणीला प्रत्येक परिस्थितीत तिचे संरक्षण करण्याचे वचन देतो. रक्षा बंधन हा सण दरवर्षी श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो. यावर्षी हा सण रविवार, 22 ऑगस्ट रोजी येत आहे. यावेळी राखीच्या दिवशी भद्रा असणार नाही. त्यामुळे बहिणी दिवसभर आपल्या भावांना राखी बांधू शकतात. मात्र अशा काही गोष्टी आहेत ज्या भाऊ आणि बहीण दोघांनीही चुकुनही करू नये, अन्यथा त्याचे खूप अशुभ परिणाम होतील. (Raksha Bandhan 2021 Gift Idea: रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला 'हे' गिफ्ट्स देऊन करा खुश )
रक्षाबंधनाच्या दिवशी ही कामे करू नका
- रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा आणि राहूकालात राखी बांधली नाही पाहिजे. भद्रा आणि राहुकालात राखी बांधणे भाऊ आणि बहिणीसाठी खूप अशुभ आहे.
- रक्षाबंधनाला भाऊ आणि बहीण दोघांनीही काळा रंग वापरणे टाळावे. हे नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते.
- राखी बांधताना भावाचा चेहरा दक्षिण दिशेला नसावा हे लक्षात ठेवावे. राखी बांधताना पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करणे उत्तम मानले जाते.
- रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाऊ आणि बहिणीने एकमेकांना टॉवेल किंवा रुमाल भेट देऊ नये. ते शुभ मानले जात नाही.
- रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधताना, टिळ्यामध्ये अक्षतासाठी फक्त उभे तांदूळ वापरा. तुटलेल्या तांदळाचा टिळा लावू नका. कारण अक्षत म्हणजे ज्याला इजा झाली नाही ते असते .