
Photography हे सुंदर आर्ट आहे. एका क्लिकमध्ये क्षण टिपून कायमस्वरूपी आठवणींच्या स्वरूपात बंद करून ठेवण्याची क्षमता या कलेमध्ये आहे. जगभरात फोटोग्राफी या कलेतून नवे फोटोग्राफर्स घडवण्यासाठी, त्यांना प्रेरणा देण्यासाठी आणि निपुण फोटोग्राफर्सच्या कलेला सलाम करण्याचा दिवस म्हणून 19 ऑगस्ट हा दिवस साजरा केला जातो. दरम्यान कला म्हटली की रियाझ आलाच. फोटोग्राफीसाठी तुम्हांला नियमित तुमची कौशल्यं सुधारणं गरजेचे आहे. फोटोग्राफी ही कला आता अनेकजण करियरचा एक पर्याय म्हणून पहायला शिकले आहेत. या क्षेत्रामध्येही वेडींग फोटोग्राफर्स, फॅशन फोटोग्राफर्स, फूड फोटोग्राफी, वाईल्डलाईफ फोटोग्राफी ते अगदी फोटो जर्नालिझम पर्यंत अनेक पर्याय आहेत. यंदा वर्ल्ड फोटोग्राफी डे 2020 (World Photography Day ) च्या निमित्ताने आम्ही तुमच्यापर्यंत जगभरातील दिग्गजांचे काही प्रेरणादायी विचार (Inspirational Quotes) शेअर करत आहोत. आशा आहे की, त्याचा फायदा जगभरात फोटोग्राफी बद्दल आस्था, पॅशन असणार्या अनेकांपर्यंत पोहचून उमद्या फोटोग्राफर्सना त्यामधून प्रेरणा मिळेल.
आज वर्ल्ड फोटोग्राफी डे चं निमित्त साधत तुमच्या देखील मित्रपरिवारामध्ये, नातलगांमध्ये अशा काही उमद्या फोटोग्राफर्ससोबत तुम्ही हे कोट्स शेअर करून त्यांना आजच्या दिवशी फोटोग्राफी डे 2020 च्या शुभेच्छा देऊ शकता. World Photography Day 2020: वर्ल्ड फोटोग्राफी डे दिवशी जाणून घ्या पहिला 'Selfie' कुणाचा? कुठून आला हा शब्द!






इंटरनेट आणि सोशल मीडीया या दोन्हींच्या मागील काही वर्षात जगभरात होत असलेल्या वाढीमुळे फोटोग्राफीला एक विशेष महत्त्व आलं आहे. लाखो शब्द जी भावना मांडू शकत नाहीत ती भावना एकाही शब्दाचा वापर न करता जगाच्या कानाकोपर्यात पोहचवण्याची क्षमता फोटोमध्ये आहे. त्याला ना भाषेचं बंधन असतं ना सीमेचं! मग अशा या कलेला उलगडून पाहण्यासाठी तुम्हांला प्रेरणा देतील हे काही मोलाचे विचार!