जगभरात 19 ऑगस्ट हा दिवस वर्ल्ड फोटोग्राफी डे (World Photography Day) म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी या दिवसाच्या निमित्ताने जगभरातील फोटोग्राफर्स आपले फोटोज शेअर करतात. त्यामागील कहाणींना उजाळा देतात. याच्या माध्यमातून आगामी फोटोग्राफर्स आणि अन्य क्षेत्रातील लोकांना देखील फोटोग्राफीबद्दल थोडी अधिक माहिती आणि प्रेरणा मिळते. सध्या जगभर इंटरनेटवर सेल्फी (Selfie) काढण्याचं वेड आहे. या फोटो काढण्याच्या हटके स्टाईलची भुरळ आता आबालवृद्धांमध्ये पहायला मिळते. सेल्फीसाठी खास कॅमेरे त्याची विशिष्ट स्पेसिफिकेशन्स असतात. पण तुम्हांला ठाऊक आहे का? पहिला सेल्फी जगात कुणी घेतला असेल? हे सेल्फीज घेणं नेमकं सुरू कसं झालं? मग आज वर्ल्ड फोटोग्राफी डे च्या निमित्ताने जाणून घ्या सेल्फी बद्दल थोडं अधिक !
सेल्फी बद्दल अनेक मतमतांतर आहेत. 1839 चा एक रिपोर्ट सांगतो, Robert Cornelius या केमिस्ट (chemist) आणि फोटोग्राफीबद्दल थोडी क्रेझ असलेल्या फिलाडेल्फिया मधील व्यक्तीचा पहिला सेल्फी आहे. तो घराजवळ कॅमेरा सेटअप करून क्लिक करून फ्रेम समोर धावत जाऊन त्याने पहिला सेल्फी क्लिक केला आहे. जाणून घ्या : वर्ल्ड फोटोग्राफी डे ची तारीख आणि सेलिब्रेशन मागील इतिहास, महत्त्व.
पहिला सेल्फी
पहिल्यांदा सेल्फी शब्दाच्या मागे एका बर्थ डे पार्टीची स्टोरी आहे. 2002 साली एका ऑस्ट्रेलियन व्यक्ती, Hopey ने आपल्या ओठांना टाके पडल्याचा फोटो शेअर केला होता. दारू पिऊन पायर्यांवर धडपडल्याने त्याच्या ओठांना इजा झाली होती. त्याचा फोटो त्याने शेअर केला होता. त्यावेळेस "फोकसबद्दल सॉरी, तो सेल्फी आहे" असं त्यानं म्हटलं होतं. आणि इथूनच 'सेल्फी'चं फॅड सुरू झालं. ही Hopey कोण आहे ठाऊक नाही. त्याने स्थानिक भाषेतील स्लॅग वापरलं आणि आता त्याची क्रेझ झाली आहे.
2013 साली ऑक्सफर्ड डिक्शनरीने सेल्फी शब्दाच्या अतिवापरामुळे त्याला वर्ड ऑफ द इयर म्हणून नावाजलं. आणि आता सेल्फी या शब्दाने प्रत्येकाला त्याचं व्यसन लावलं आहे.