
सोमवारी (4 फेब्रुवारी) रोजी 'जागतिक कॅन्सर दिन' (World Cancer Day) म्हणून जागतिक पातळीवर साजरा करण्यात येणार आहे. तर यंदाच्या वर्षीसाठी कॅन्सर आजारासाठी 'I Am and I Will' ही थिम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक कॅन्सर रुग्णाला आपले मनोबळ वाढून या गंभीर आजारावर झुंझ करत पूर्णपणे बरे होण्यासाठी पाठबळ मिळणार आहे. या दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच कॅन्सर या आजाराबाबत लोकालोकांमध्ये जाऊन जनजागृतीच्या माध्यमातून मोलाचा संदेश दिला जातो. त्यामुळे या गंभीर आजाराला न घाबरता दूर घालवण्याचा प्रयत्न करा.
कॅन्सर म्हणजे काय?
आपले शरीर हे पेशींपासून बनलेले आहे. या पेशी वारंवार विभागल्या जातात. तर काही वेळेस विभाजनाच्या वेळी पेशींमध्ये गाठ निर्माण होते. ही गाठ दोन पद्धतीची असू शकते- 1) बिनाइन 2) मॅलिग्नेंट. तर बिनाइन ही गाठ धोकादायक नसून म्रलिग्नेंट या गाठीचे कँन्सरमध्ये रुपांतर होण्याची शक्यता असते.
डॉक्टरांकडे कधी जावे?
शरीरात कोणत्याही प्रकारचे असामान्य लक्षण दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांकडे जावे.
-झोपण्याचा आणि उठण्याची वेळ बदलली असेल
-तोंड उघडण्यासाठी किंवा खाद्यपदार्थ चावण्यासाठी त्रास होतो
-तसेच सातत्याने 3 आठवडे अॅसिडिटीचा त्रास जाणवत असेल
- 3 आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला
-तोंडात किंवा शरीरावरील जखम 3 आठवडे होऊन ही बरी होत नसेल
-शरीरातील रक्त कमी होत असेल
-जर शरीरात कोणत्याही प्रकारची गाठ झाल्यानंतर ती वाढत असेल तर
-आवाजात बदल होणे
कॅन्सर आजाराच्या किती स्टेज असतात?
कॅन्सर या आजाराच्या प्रामु्ख्याने 4 स्टेज असतात.
स्टेज 1: ही कॅन्सरच्या सुरुवातीची स्टेज असून ज्या ठिकाणी कॅन्सर झाला आहे तो त्याच ठिकाणी राहतो. तर कॅन्सरची साईज ही 2 इंच असते.
स्टेज 2: तर स्टेज 2 मध्ये कॅन्सर हा त्याच ठिकाणी राहून वाढतो आणि त्याची साईज 5 इंच झाल्यास तो मूळ रुपाने कॅन्सर झाले असल्याचे सांगितले जाते. तर स्टेज 1 आणि 2 मध्ये कॅन्सरवर योग्य उपचार घेतल्यास तो बरा होण्याची शक्यता खूप असते.
स्टेज 3: या स्टेजला इंटरमीडिएट स्टेज म्हटले जाते. या स्थित कॅन्सर ज्या ठिकाणी झाला असून त्या ठिकाणापासून आजूबाजूच्या ठिकाणी पसरतो. परंतु उपचार मुश्किल असतात पण बरे होण्याची शक्यता ही नकारता येत नाही.
स्टेज 4: तर शरीरातील आजूबाजूच्या ठिकाणी पसरत गेल्याने खासकरुन उपचार करणे अशक्य होते.
त्यामुळे लोकांनी कॅन्सर पासून वाचण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करणे आवश्यक आहे.