गणपती बाप्पा, मोदक (फोटो सौजन्य - File Image)

Ganesh Chaturthi 2024: मोदक (Modak) समोर आला की, आपल्याला सर्वात प्रथम आठवतो तो म्हणजे गणेशोत्सव. दरवर्षी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2024) साजरी केली जाते. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाचा आनंद केवळ भारतातच नाही तर जगभरात पाहायला मिळतो. गणेशोत्सव (Ganeshotsav 2024) आणि मोदक हे दोन्ही एकमेकांशी संबंधित आहेत. गणेशोत्सवाबरोबर मोदकांची मागणीही वाढते. घर असो किंवा मिठाईचे दुकान, हे फक्त गणेश चतुर्थीच्या पवित्र सणानिमित्त तयार केले जातात. आज आम्ही तुम्हाला गणपतीला मोदक का अर्पण केले जातात, यामागील कारण सांगणार आहोत.

गणपतीला मोदक का अर्पण केले जातात?

मोदक हे तांदळाचे पीठ, खवा आणि साखरेपासून बनवलेला गोड पदार्थ आहे. पुराणानुसार मोदक हे गणपतीचा आवडता पदार्थ आहे. तथापि, या संदर्भात भिन्न तथ्य देखील आहेत. यामागील एक कथा देवी अनुसूया आणि भगवान शिव यांच्याशी संबंधित आहे. पुराणानुसार, देवी अनुसूयाने भगवान शंकरांना आपल्या घरी भोजनासाठी आमंत्रित केले होते. माता पार्वती आणि भगवान शिव यांच्यासह गणपतीही अनुसूया देवीच्या घरी गेले. या वेळी त्यांचा पहिला विचार गणपतीला खाऊ घालण्याचा होता. यानंतर गणपतीने जेवायला सुरुवात केली. बराच वेळ झाला तरी त्याची भूक शमली नाही. (Ganesh Sthapana Muhurat 2024: 'या' शुभ मुहूर्तावर करा श्रीगणेशाची स्थापना; जाणून घ्या शुभ मुहूर्ताची वेळ आणि पूजाविधी)

मात्र, अनुसुईया देवीने गणपतीला मोदक खाऊ घालताच त्यांचे पोट लगेच भरले. तेव्हापासून गणपतीला त्यांचा आवडता गोड पदार्थ म्हणजेचं मोदक अर्पण केला जातो. तथापी, दुसरी कथा भगवान परशुरामाशी संबंधित आहे. पुराणानुसार भगवान परशुराम भगवान शिवाला भेटायला आले होते. यावेळी भगवान शिव झोपले होते आणि भगवान गणेश बाहेर पहारा देत होते. गणरायाने भगवान परशुरामांना दारातच थांबवले. यामुळे ते खूप रागावले आणि गणपतीशी भांडू लागले. भगवान परशुरामांनी बाप्पावर हल्ला केला तेव्हा त्यांचा एक दात तुटला. (हेही वाचा - Ganesh Chaturthi 2024 Invitation Card in Marathi: गणेश चतुर्थीनिमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून मित्र-परिवारास पाठवा खास आमंत्रण पत्रिका)

त्यामुळे त्यांना अन्न खाण्यास त्रास होऊ लागला. यानंतर माता पार्वतीने त्यांची समस्या सोडवण्याचा मार्ग शोधला. त्यांनी गणपतीसाठी मऊ आणि सहज खाण्यायोग्य मोदक बनवले. हे खाल्ल्यानंतर त्याला खूप आनंद झाला. तेव्हापासून हा पदार्थ त्यांचा आवडता बनला असल्याचे सांगितले जाते.