Ganesh Chaturthi 2024 Invitation Card in Marathi: गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2024) म्हणजेच भगवान महादेव आणि माता पार्वतीचा लाडका पुत्र भगवान गणेश यांचा जन्मोत्सव महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. असे मानले जाते की, हिंदू कॅलेंडरनुसार, भगवान गणेशाचा जन्म भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला झाला होता, म्हणून त्यांची जयंती गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. यंदा गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर 2024 रोजी साजरी केली जात आहे. या दिवसापासून दहा दिवसांचा गणेशोत्सव देखील सुरू होतो, जो 17 सप्टेंबर 2024 रोजी अनंत चतुर्दशीला संपेल.
गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाच्या दर्शनासाठी मित्र-परिवारास आमंत्रण दिले जाते. जर तुम्हाला तुमच्या प्रियजनांना बाप्पाच्या आरतीसाठी घरी बोलवायचे असेल तर आम्ही तुमच्यासाठी खास आमंत्रण पत्रिका (Invitation Card) घेऊन आलो आहोत, ज्या तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या मित्र-परिवारास पाठवू शकता आणि त्यांना तुमच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी आमंत्रण करू शकता.
गणेश चतुर्थीनिमित्त पाठवता येतील अशा खास मराठी आमंत्रण पत्रिका -
सस्नेह निमंत्रण..!
यंदाही आमच्या कडे 7 सप्टेंबरला गणरायाचं आगमन होणार आहे.
तरी गौरी-गणपतीच्या दर्शनाला नक्की यावं हे आग्रहाचं आमंत्रण !
वेळ -
पत्ता -
यंदा आमच्या घरी पाच दिवस गणरायाचं आगमन होणार आहे. या निमित्ताने आमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी नक्की या. बाप्पाच्या दर्शनासाठी आग्रहाचे निमंत्रण. आपला नम्र
पत्ता -
फोन नंबर -
वेळ -
|| श्री गणेशाय नम: ||
दरवर्षीप्रमाणे यंदाही आमच्याकडे 07 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर या 5 दिवसांसाठी लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. तरी आपण सर्वांनी सहकुटूंब आणि सहपरिवार गौरी-गणपतीच्या दर्शनासाठी यावे.
हे आग्रहाचे आमंत्रण
पत्ता -
वेळ -
|| गणपती बाप्पा मोरया ||
|| श्री गणेशाय नम: ||
दरवर्षी प्रमाणे यंदाही आमच्या घरी 07 सप्टेंबर 2023 रोजी लाडक्या बाप्पाचे दीड दिवसांसाठी आगमन होणार आहे. तरी आपण सहकुटुंब आणि सहपरिवार गणपतीच्या दर्शनासाठी यावे.
आपला नम्र
पत्ता -
वेळ -
|| श्री गणेशाय नम: ||
सालाबादप्रमाणे यंदाही आमच्याकडे १० दिवसांसाठी गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. तरी आपण आमच्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनाला यावं ही विनंती.
पत्ता -
वेळ -
पौरानिक कथांनुसार, गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा आपल्या भक्तांचे सर्व अडथळे दूर करून त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात, त्यानंतर दहा दिवसांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणपती बाप्पांची पूजा केली जाते. देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.