
2nd Solar & Lunar Eclipse 2025 Date: मार्च महिन्यात वर्षातील पहिले सुर्यग्रहण झाले. 2025 मध्ये चार ग्रहणे होणार आहेत, त्यापैकी 2 आधीच होऊन गेली आहेत. पहिले चंद्रग्रहण 14 मार्च रोजी झाले होते, तर सूर्यग्रहण (Solar Eclipse 2025) २९ मार्च रोजी झाले होते. तथापि, हे दोन्ही ग्रहण भारतात दिसले नाहीत. आता लोक पुढील दोन ग्रहणांची आतुरतेने वाट पाहत आहेत. लोकांना हे ग्रहण भारतात दिसतील की नाही हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. वर्षातील दुसरे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण कधी होईल आणि भारतीयांना ही आश्चर्यकारक खगोलीय घटना पाहता येईल की नाही? ते जाणून घेऊया.
2025 सालचे दुसरे सूर्यग्रहण कधी होईल?
वर्षातील दुसरे सूर्यग्रहण 21 सप्टेंबर 2025 रोजी अमावस्येच्या दिवशी होईल. हे ग्रहण 21 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजल्यापासून 22 सप्टेंबर रोजी पहाटे 3:24 वाजेपर्यंत राहील. म्हणजेच हे ग्रहण एकूण 4 तास 24 मिनिटे चालेल. (हेही वाचा -Blood Moon 2025: होळीच्या दिवशी आकाशात दिसणार 'ब्लड मून'; जाणून घ्या कधी, कुठे, कसा पहाल हा नजारा)
वर्षातील दुसरे सूर्यग्रहण भारतात दिसेल का?
पहिल्या ग्रहणाप्रमाणे दुसरे सूर्यग्रहणही भारतात दिसणार नाही. हे ग्रहण ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, पॅसिफिक महासागर आणि अटलांटिक महासागराच्या काही भागात दिसणार आहे. (हेही वाचा: NASA New Report On Asteroid Hitting Earth: धोका टळला? 300 फूट रुंदीचा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याच्या शक्यतेवर नासाचा नवीन रिपोर्ट जारी)
2025 सालचे दुसरे चंद्रग्रहण कधी होईल?
दुसरे चंद्रग्रहण 7 सप्टेंबर 2025 रोजी होईल. या दिवशी भाद्रपद पौर्णिमा साजरी केली जाईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार, हे ग्रहण रात्री 09:57 वाजता सुरू होईल आणि 8 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12:23 पर्यंत राहील.
2025 चे दुसरे चंद्रग्रहण भारतात दिसेल का?
हे ग्रहण भारतात दिसेल, अशा परिस्थितीत सुतक काळ वैध असेल. हे ग्रहण ऑस्ट्रेलिया, युरोप, न्यूझीलंड, अमेरिका आणि आफ्रिकेतही दिसेल.